-
गेल्या काही दिवसांपासून बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपाचर सुरु होते.
-
लालू यादव नुकतेच दिल्ली एम्समधून उपचार घेऊन बिहारमध्ये परतले आहेत.
-
पाटणा येथील राबरी निवासस्थानी पायऱ्यांवरून पडल्याने त्यांच्या खांद्याला फ्रॅक्चर झाले.
-
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांची भेट घेतली.
-
उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव हे देखील यावेळी उपस्थित होते. (स्रोत: पीटीआय)
-
नितीश कुमारांनी गुलाबाचं फूल देऊन लालू प्रसाद यादवांचे स्वागत केलं.
-
एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रु असलेले नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव आता चांगले मित्र बनले आहेत.
-
भाजपासोबत युती तोडल्यानंतर नितीश कुमारांनी राजदसोबत युती केली आणि बिहारमध्ये नवे सरकार स्थापन केले.
-
राजदसोबत युती केल्यानंतर नितीश कुमारांनी मुख्यमंत्री आणि तेजस्वी प्रसाद यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
-
रुग्णालयातून परतल्यावर लालू प्रसाद यादव पुन्हा आपल्या जुन्या अंदाजात दिसून आले.
-
हुकूमशाही सरकारला हटवावे लागेल. मोदींना हटवावे लागेल अस म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
-
या दोघांच्या भेटीने आता बिहारमधील समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे.

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य