-
भाजपा आमदार राम कदम यांची घाटकोपरमधील दहीहंडी दरवर्षी चर्चेचा विषय असते.
-
यंदाही अनेक दिग्गज राजकीय नेते सहभागी झाल्याने राम कदम यांच्या दहीहंडीची जोरदार चर्चा आहे.
-
या सर्व राजकीय नेत्यांमध्ये भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची उपस्थिती दिवसभर जोरदार चर्चेत आहे.
-
किरीट सोमय्या केवळ दहीहंडी कार्यक्रमात सहभागी झाले नाही, तर स्वतः तीन थराच्या दहीहंडीवर चढले आणि हंडी फोडली.
-
किरीट सोमय्या यांनी हंडी फोडताच उपस्थितांमध्ये जोरदार जल्लोष दिसला.
-
स्वतः आमदार रामदास कदम यांनीही सोमय्या यांच्या या उत्साहाचं कौतुक केलं.
-
तसेच सोमय्यांच्या या सहभागासाठी त्यांचे आभार मानले.
-
यावेळी किरीट सोमय्या यांनी आपण मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची हंडी फोडत असल्याचं म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला.
-
हंडी फोडल्यानंतर तेथे उपस्थित गोविंदांनी सोमय्यांना खांद्यावर घेत स्टेजकडे नेलं.
-
स्टेजवर आल्यानंतर किरीट सोमय्यांनी ढोल पथकासोबत ढोलही वाजवला.
-
ढोल पथकातील महिला सदस्यांना प्रोत्साहन देत त्यांनी त्यांच्यासोबतही ढोल वाजवला.
-
तीन थर चढून हंडी फोडल्यानंतर सोमय्यांनी ज्या उत्साहाने डोल वाजवला ते पाहून उपस्थितांनी त्यांना चांगलीच दाद दिली.
-
ढोल वाजवताना सोमय्यांनी पथकाच्या सदस्यांप्रमाणेच ठेका धरला आणि ढोल वाजवण्याचा आनंद घेतला.
-
स्वतः सोमय्या ढोल वाजवत असल्याने ढोल पथकाचाही उत्साह वाढलेला पाहायला मिळाला.
-
ढोल वाजवल्यानंतर किरीट सोमय्यांनी ताशा हातात घेतला.
-
तसेच ताशा वाजवत आपल्यातील गोविंदाची प्रचिती दिली.
-
इतकंच नाही, तर सोमय्या ढोलच्या ताशावर थिरकले देखील.
-
सोमय्या थिरकत असताना ढोल पथकांनेही त्यांना जोरदार प्रतिसाद दिला.
-
सोमय्यांचा हा उत्साह पाहून राम कदम यांनी त्यांचा हात उंचावून कौतूक केलं.
-
एकूणच राम कदम यांच्या या दहीहंडीत सोमय्यांची जोरदार चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.
-
सोमय्यांच्या उत्साहाचं जोरदार कौतुकही झालं. (सर्व फोटो सौजन्य : राम कदम दहीहंडी लाईव्ह)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख