-
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं लोकार्पण करण्यात आलं.
-
ही बस डिसेंबर ते जानेवारी महिन्यात प्रवाशांच्या सेवेत बेस्टकडून सुरु करण्यात येणार आहे.
-
भारतातील अशोक लीलैंड या कंपनीने ही बस तयार केली आहे.
-
पूर्णपणे अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली आणि प्रदूषण पूर्णपणे कमी करेल.
-
टप्प्याटप्प्याने २०० इलेक्ट्रिक डबल डेकर बस या बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील.
-
मुंबईत इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने दाखल होत असताना आता डबल डेकर बसचं गिफ्ट मुंबईकरांना या निमित्ताने मिळालं आहे.
-
इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं लोकार्पण सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थि होते.
-
यासोबतच स्वयंचलित प्रकाश पथदिवे प्रणालीच्या पथदिप या ऍपचे देखील उद्धाटन करण्यात आलं.
-
बेस्ट प्रशासनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘बेस्ट कॉफी टेबल बुक’ आणि ‘बेस्ट उपक्रमाची अमृतमहोत्सवी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
-
१२ वी ऐवजी पदवी पर्यंतच्या विद्यार्थांना बेस्टकडून पासेस देण्यात येतील अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली
-
यावेळी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते.
-
एकूण 65 प्रवासी प्रवास या बसमध्ये करु शकतात. पहिल्या मजल्यावर ३० सीट दुसऱ्या मजल्यावर ३५ सीट आहेत
-
इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरु झाल्यानंतर १५० महिला कंडक्टरना बेस्ट सेवेत रुजू करून घेण्यात येणार आहे.
-
या इलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषण कमी होईल.
-
एकूण ९६ प्रवासी एका वेळी बसून आणि उभे राहून प्रवास करु शकतात.
-
ही बस पूर्णपणे वातानुकूलित शिवाय आरामदायी सीट्स असल्याने प्रवाशांना सर्व सोयी-सुविधायुक्त आरामादायी प्रवास या निमित्ताने अनुभवता येणार आहे
-
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरा, जीपीएस सिस्टीम, प्रवाशांसाठी सीट बेल्ट या बसमध्ये आहे
-
प्रत्येक सीटच्या खाली मोबाईल फोन चार्जिंगची व्यवस्था आहे
-
. डबल डेकर बसमध्ये दोन्ही बाजूंनी वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत
-
एकूण प्रदूषणापैकी ३५ टक्के प्रदूषण हे पेट्रोल आणि डिझेलमुळे होत आहे.” “इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषणात घट होईल, अशी भावना गडकरींनी व्यक्त केली आहे.

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल