-
करोना महासाथीमुळे दोन वर्षांनंतर दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे त्याचा उत्साह ओसंडून वाहत होता.
-
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी गर्दी केली होती.
-
ठाणे शहरातील जांभळी नाका येथे खासदार राजन विचारे यांच्या दहीहंडी उत्सवाला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री उपस्थिती लावली.
-
या उत्सवाच्या व्यासपीठावर येण्यापूर्वी त्यांनी टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
-
शिवसेनेतील बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार पुढे नेत असल्याचे सांगत आहेत.
-
त्यांच्या समर्थकांकडूनही आनंद दिघे यांच्या नावाचा उल्लेख होत आहे.
-
तसेच शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाणे जिल्ह्यातून शिंदे यांना मोठे समर्थन मिळाले आहे.
-
या बंडखोरीनंतर आदित्य हे पहिल्यांदाच ठाणे शहरात दहीहंडी उत्सवाच्यनिमित्ताने आले होते.
-
आदित्य ठाकरे यांनी खासदार राजन विचारे यांच्या जांभळी नाका येथील दहीहंडीला हजेरी लावली.
-
या उत्सवाच्या व्यासपीठावर येण्यापूर्वी त्यांनी टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले असून त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : राजन विचारे, आदित्य ठाकरे / ट्विटर)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी