-
सफीन हसन हे भारतीय आयपीएस अधिकारी आहेत. आयपीएस अधिकारी बनणारे ते सर्वात तरुण भारतीय आहेत.
-
२०१८ च्या UPSC नागरी सेवा परीक्षेत सफीन हसनने ५७० वा क्रमांक मिळविला होता.
-
हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. तेव्हा ते केवळ २२ वर्षांचे होते..
-
सफीन हसन हे गुजरात केडरच्या २०१८ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
-
सफिन हसनने प्राथमिक शाळेतच ठरवले होते की त्यांना आयएस आयपीएस व्हायचे आहे. सफीनचे वडील इलेक्ट्रिशियन होते. आई आधी हिऱ्याच्या कारखान्यात काम करायची, मग लग्नात पोळ्या बनवण्याचं त्या करु लागल्या.
-
आर्थिक परिस्थिती भक्कम नसल्याने आपली स्वप्ने पूर्ण करणे सफीन यांच्यासाठी सोपे नव्हते.
-
कॉलेजमध्ये मित्र त्यांच्या इंग्रजी बोलण्याच्या पद्धतीची खिल्ली उडवायचे. पण ते इंग्रजी बोलत राहिले.
-
त्यांनी यूपीएससीची मुलाखत इंग्रजीत दिली. परिक्षेत संपूर्ण देशात ते दुसऱ्या क्रमांकावर होते.
-
चालू घडामोडींच्या तयारीबाबत सफीन म्हणतात, “यूपीएससीचे उमेदवार वर्तमानपत्रातून चालू घडामोडींच्या नोट्स बनवतात पण मी त्या कधीच बनवल्या नाहीत.
-
माझा विश्वास आहे की आपण कोचिंग संस्थांसाठी एवढी भरमसाठ फी भरतो, ते आपल्याला खूप चांगली मासिके देतात.
-
आपण फक्त तीच वाचली पाहिजेत, ते पुरेसे आहे. तेच लोक आपल्यासाठी एवढ्या कष्टाने नोटस बनवत आहेत, मग मी स्वतः नोटस काढण्यात वेळ का घालवायचा.’
-
दुसर्या एका मुलाखतीत सफीन म्हणाले होते की, ‘चाणक्य म्हणतात की जे इतरांच्या अनुभवातून शिकतात, ते लवकर पुढे जातात
-
कारण स्वतःकडून अनुभव घेऊन सर्व काही शिकण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे.
-
म्हणूनच मी माझ्या कॉलेजच्या दिवसात टॉपर्सचे खूप ब्लॉग वाचले.
-
त्यांनी कोणत्या चुका केल्या आहेत आणि मी त्या करू नयेत हे मला माहीत आहे.

Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा