-
राजस्थानच्या चुरू येथील रहिवासी असलेल्या ऐश्वर्या शेओरानने आपले मॉडेलिंग करिअरला रामराम करत IAS ऑफिसर बनली आहे.
-
ऐश्वर्या शेओरानकडे मॉडेलिंग करिअर सुरू ठेवली असती तर ती सहज मॉडेल आणि अभिनेत्री बनू शकली असती.
-
मात्र, तिने आयएएस होण्याचा निर्णय घेतला आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
-
ऐश्वर्याने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नसून तिने स्वतः परीक्षेची तयारी केली होती.
-
युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ऐश्वर्याने १० महिने तयारी करत होती. या दरम्यान तिने स्वतःला अभ्यासात पूर्णपणे गुंतवून ठेवले.
-
कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय २०१८ मध्ये युपीएससी परीक्षा दिली होती. तिने केवळ पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर देशात ९३ वी रँक देखील मिळवली आहे.
-
नागरी सेवेत येण्यापूर्वी ऐश्वर्या एक यशस्वी मॉडेल होती. २०१६ मध्ये ऐश्वर्याने मिस इंडियाची स्पर्धा जिंकली होती.
-
२०१५ मध्ये तिने मिस दिल्लीचा ताज जिंकला होता. २०१४ मध्ये, तिला मिस क्लीन अँड केअर फ्रेश फेस म्हणून मतदान करण्यात आले.
-
ऐश्वर्याच्या सुरुवातीच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर तिने तिचे शालेय शिक्षण दिल्लीतील चाणक्यपुरी येथील संस्कृती स्कूलमधून पूर्ण केले. तिने १२वी बोर्डाच्या परीक्षेत ९७.५ टक्के गुण मिळवले होते ती तिच्या शाळेत टॉपर होती.
-
ऐश्वर्याने दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.

रामनवमीला निर्माण होतो आहे दुर्मिळ संयोग, ‘या’ ३ राशींच्या लोकांवर होईल प्रभु श्री रामाची कृपा