-
राज्य सरकारने दहीहंडीचा क्रिडा प्रकारामध्ये समावेश केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षणाची घोषणा केली.
-
त्यामुळे वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी वर्गात नाराजी पाहण्यास मिळाली.
-
त्याच दरम्यान भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील विटी दांडू खेळणाऱ्याला देखील आरक्षण देण्यास काही हरकत नसल्याची भूमिका मांडली होती
-
या विधानाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात विद्यार्थी आणि राज्य सरकारचे विरोधक आक्रमक झाले असून, ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे.
-
आज पुण्यातील फर्ग्युसन रोडवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विटी दांडू, गोट्या, सापशिडी, भोवरा खेळून राज्य सरकारचा निषेध नोंदविला.
-
यावेळी महिला कार्यकर्त्यांनी मंगळागौरीचे खेळ खेळत आंदोलनात सहभाग नोंदवला.
-
अभ्यास सोडा दहिहंडी फोडा, असे फलक दर्शवून निषेध नोंदवला गेला.
-
तरूण कार्यकर्त्यांनी फूटपाथवरच बैठक मांडत पत्ते खेळले
-
तर काही कार्यकर्त्यांनी विटी दांडूचा खेळ सुरू केला.
-
काही कार्यकर्त्यांनी गोट्या खेळल्या.
-
दोरीवरील उड्ड्या मारण्याचा देखील खेळ खेळला गेला.
-
तरुणींनी बैठक मांडत सापशिडीची खेळ सुरू केला
-
डोंबाऱ्याचा खेळ दाखवला गेला.
-
एमपीएससीचा दर्जा कमी लेखणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, असेहीा फलक दर्शवले गेले.
-
“विश्वासघात आणि ५० खोके घेऊन राज्यात ‘ईडी’ सरकार आलं आहे.”
-
“केवळ घोषणाबाजी करण्यात हे ‘ईडी’ सरकार व्यस्त आहे.”
-
“या सरकारने मागील ४० दिवसांत शेतकरी, सर्व सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने निर्णय घेतले नाहीत.” असे आरोप करण्यात आले.
-
या ‘ईडी’ सरकारने विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

Vaibhav Suryavanshi: १४ वर्षीय वैभवने रचला इतिहास! ३५ चेंडूत झळकावलं वादळी शतक