-
जगातील टॉप १० अब्जाधीशांच्या यादीत भारतातील अदानी आणि अंबानी या दोन दिग्गज उद्योगपतींचा समावेश आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले असून तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्त ठरले आहेत.अदानी आणि अंबानी यांच्या संपत्तीमध्ये ४५ अरब डॉलरचा फरक आहे.
-
फोर्ब्सच्या यादीनुसार अदानींची एकुण संपत्ती १४० अरब डॉलर आहे. या संपत्तीसह टॉप १० अब्जाधीशांच्या यादीत अदानी चौथ्या स्थानावर आहेत. अॅमेझॉनचे जेफ बेझोस या यादीत १६२.७ अरब डॉलरसह तिसऱ्या स्थानी आहेत.
-
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या एकुण संपत्तीत ४५ अरब डॉलरचं अंतर आहे. मुकेश अंबानींची एकुण संपत्ती १०० अरब डॉलरच्या खाली आहे. या संपत्तीसह ते अब्जाधीशांच्या यादीत १० व्या स्थानी आहेत.
-
एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अॅमेझॉनचे जेफ बेझोस एलन मस्कनंतर फ्रांसचे उद्योगपती बनार्ड अर्नाल्ट यांच्यापेक्षाही संपत्तीत मागे आहे. मात्र, या दोघांच्या संपत्तीतील अंतर आता कमी होताना दिसत आहे. बनार्ड अर्नाल्ट यांची एकुण संपत्ती १६९.७ अरब डॉलर आहे तर जेफ बेझोस १६२.७ अरब डॉलरचे मालक आहेत.
-
फोर्ब्सच्या यादीनुसार गौतम अदानींनी मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्यासह जगातील दिग्गज उद्योगपतींना संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे.
-
टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. बऱ्याच काळापासून हे स्थान त्यांनी कायम ठेवले आहे. मस्क यांची एकुण संपत्ती २६३.४ अरब डॉलर आहे.
-
फोर्ब्सच्या टॉप १० अब्जाधीशांच्या यादीत लैरी पेज आठव्या स्थानी आहे. त्यांची एकुण संपत्ती १००.१ अरब डॉलर आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग अब्जाधीशांच्या यादीत १६ व्या स्थानावर आहेत.
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?