-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज(बुधवार) देहूत जाऊन श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन घेतले.
-
यावेळी देहू संस्थानचे नितीन महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, संतोष महाराज मोरे आदी उपस्थित होते.
-
देहू संस्थानच्यावतीने विश्वस्तांनी राज्यपालांचा सत्कार केला.
-
यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी देहू संस्थानच्या नोंद वहीत अभिप्रायही नोंदवला.
-
“जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे जीवन प्रेरणादायी असून त्यांचे अभंग अनेक युगापर्यंत मानवजातीला मार्गदर्शन करतील.”, असे त्यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.
-
“महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि तुकोबाराय हे सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे विचार अखंडितपणे अंमलात राहतील, यात शंका नाही.” असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले आहेत.
-
पहिल्यांदाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पहिल्यांदाच देहूत आले होते.
-
तुकोबारायांच्या मुख्य मंदिरात भगतसिंह कोश्यारी यांचं टाळ, मृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आलं.
-
यावेळी राज्यपालांनी स्वत: गळ्यात टाळ घेऊन भजन केलं.
-
वारकऱ्यांसह टाळ आणि मृदंगाच्या गजरात राज्यपाल तुकोबांच्या नामघोषात तल्लीन झाले होते.
-
राज्यपालांनी विठूमाऊलीचं देखील दर्शन घेतलं.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”