-
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. सरकारच्या धोरणावर विरोधकांकडून कठोर टीका केली जात आहे.
-
या अधिवेशनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील सक्रिय सहभाग नोंदवत असून विरोधकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.
-
त्यांनी २४ ऑगस्ट रोजी विधानसभेच्या सभागृहात जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी राज्यातील सत्तासंघर्ष आणि शिंदे गट-भाजपा सरकारमधील खातेवाटपावरही बोट ठेवले.
-
देवेंद्र फडणवीस हे आगामी काळात पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असतील. मात्र त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. हा महाराष्टाचा अवमान आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
-
तसेच औरंगाबादसारख्या जिल्ह्यात दोन मंत्रीपदे दिली आहेत. आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांना कुठे अॅडजस्ट करणार? असा खोचक सवालही त्यांनी केला.
-
या मंत्रीमंडळात एकच ध्रुवतारा आहे, तो म्हणजे गुलाबराव पाटील. त्यांचे खाते बदलण्यात आले नाही. बाकी सर्व मंत्र्यांची खाती बदलण्यात आली, असे म्हणत त्यांनी खातेवाटपावर नाराज असलेल्या मंत्र्यांना डिवचले.
-
चंद्रकांत पाटील यांच्यावर अन्याय झाला. त्यांना उच्च व तंत्रशिक्षण खातं देण्यात आलं. शंभूराज देसाई यांना उत्पादन शुल्क मंत्रीपद देण्यात आलं. एखाद्या प्रगती करणाऱ्या नेत्याला उत्पादन शुक्ल खातं देण्यात आलं. हे खातं चांगलं आहे का? असे जयंत पाटील म्हणाले.
-
हरिभाऊ रोठोड यांनी आरएसएसचं काम खूप वर्षे केलं. त्यांना एकदा विधानसभेचं अध्यक्ष केलं. त्यावेळी ते चिडले होते. औरंगाबाद जिल्ह्याची एक टोपी घेतली मग दुसरी टोपी का नाही घेतली? जी निष्ठेची टोपी आहे ती बाहेर ठेवली,” अशी टोलेबाजी जयंत पाटील यांनी केली.
-
मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आहे, असे चंद्रकांत पाटील एका बैठकीत म्हणाले होते. भारतीय जनता पक्षाने मनावर दगड ठेवून आमच्या शिंदे यांना मुख्यमंत्री केले असेल तर कुठलीही भानगड ठेवता आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देऊ, अशी ऑफर जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना दिली.
-
एकनाथ शिंदे यांनी आपण घेतलेले बरेच निर्णय देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसतात. हे सत्य असेल तर तुम्ही तुमचा कणखरपणा दाखवत आहात,” असा मिश्किल टोलादेखील जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
-
हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सत्तासंघर्षाचा प्रश्न आता न्यायालयात आहे. आपण मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेत असताना देवेंद्र फडणवीसांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”