-
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरले.
-
या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.
-
आज कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरदेखील दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून ही बाब गंभीर असल्याचे नमूद केले.
-
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात आतापर्यंत कोणत्या गुन्हे प्रकारात किती गुन्हे दाखल झाले, याची माहिती दिली.
-
तसेच इतर माहिती देत कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असेल, अशी ग्वाही दिली.
-
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या डान्स बारच्या मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेत चांगलीच टोलेबाजी केली.
-
राज्यात सध्या कोठेही डान्स बार सुरू नाहीत. जे व्हिडीओ समोर आले होते, ते जुने आहेत, असे शिंदे म्हणाले.
-
-
“ठाण्यातील डान्स बार बंद आहेत. जितेंद्र आव्हाड यांना माहिती आहे. ते तिकडे..” असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.
-
तसेच “मी तुमच्याबद्दल (जितेंद्र आव्हाड) वाईट बोलत नाहीये. तुम्ही बघायला जाता, असं मी सांगत नाहीये,” अशी मिश्किल टिप्प्णी एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून केली.
-
विशेष म्हणजे शिंदे यांच्या या कोपरखळीनंत विरोधकांमध्येही खसखस पिकली.
-
जितेंद्र आव्हाड यांनादेखील हसू आवरले नाही. त्यांनी एकनाथ शिंदेंना हात जोडले.
-
पुढे बोलताना, “आपल्याकडे डान्स बार पूर्वी सुरू होते. आता बंद आहेत, असं मी म्हणत होतो,” असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”