-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अनेक महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
-
त्यापैकीचं एक प्रकल्प म्हणजे प्रसिध्द फुटाळा तलावाच्या निसर्ग सौंदर्यात अलौकिक भर घालणारे कारंजे.
-
फुटाळा येथे पाण्यावर तरंगणारा जगातील सर्वात मोठा संगीतमय कारंजा म्हणजेचं म्युझिकल फाउंटन तयार करण्यात आला आहे.
-
याशिवाय लाईट शो देखील नागपूरकरांना आता बघता येणार आहे.
-
गुरुवारी (२५ ऑगस्ट) या प्रकल्पाचे प्रथम प्रात्यक्षिक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले आहे.
-
तलावाचे पाणी फाउंटनच्या माध्यमातून मधुर संगीताच्या तालावर नाचणार आहे.
-
फुटाळा तलावातील म्युझिकल फाउंटन हा जगातील सर्वात उंच म्युझिकल फाउंटन असल्याचा दावा केला जात आहे.
-
या म्युझिकल फाउंटन बरोबर वाजणारे संगीत दिग्गज संगीतकार ए. आर. रेहमान यांचे आहे.
-
हा प्रकल्प साकार करण्यासाठी केंद्र सरकारच्या रोड फंडातून ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
-
एकवेळ ४ हजार प्रेक्षक एकत्र या ‘शो’चा आनंद घेऊ शकणार आहेत.
-
प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर मराठी भाषेत, हिंदीतून गुलजार आणि इंग्रजीतून महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजात समालोचन स्वरूपात नागपूरचा गौरवशाली इतिहास ऐकायला मिळणार आहे.
-
याशिवाय संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेली सिग्नेचर ट्यून, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील लोकप्रिय चित्रपटांच्या गीतांच्या तालावर पाण्याचे हे कारंजे नाचणार आहेत.
-
यावेळी नितीन गडकरी म्हणाले, “मी कॉलेजमध्ये शिकत असतात क्लासमध्ये बोअर झालो की मित्रांसोबत फुटाळा तलाव येथे यायचो.”
-
“मी या ठिकाणी मित्रांसोबत चहा पीत बसायचो आणि यावेळी अनेक तास कसे निघून जायचे ते कळायचे सुद्धा नाही,” अशीही आठवण गडकरींनी सांगितली.
-
तसेच या तलावाने अनेकांचे लग्नसुद्धा जुळवून आणले असल्याचं नितीन गडकरी यांनी हसत हसत सांगितले.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”