-
पुण्यातील येरवडा कारागृहामार्फत यंदा प्रथमच २५० शाडू मातीच्या मूर्ती कैद्यांकडून तयार करण्यात आल्या आहेत.(फोटो – सागर काथार)
-
त्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, लालबागचा राजा अशा सुंदर आणि सुबक अशा मूर्ती विक्रीस देखील ठेवल्या आहेत.
-
या सर्व मूर्ती पर्यावरणपूरक आणि सर्वांना दर परवडणारे असल्याने, नागरिक अधिकाधिक खरेदीस पसंती देत आहेत.
-
या उपक्रमाबाबत येरवडा कारागृहाच्या राणी भोसले म्हणल्या की, “येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या मार्फत विविध वस्तू तयार केले जातात.
-
त्या वस्तूची विक्री वर्षभर आपल्या येथील विक्री केंद्रावर सुरू असते. त्यातून चांगले उत्पन्न मिळते.
-
पण त्याहीपेक्षा कैद्यांना त्यांच्यातील कला गुणांना वाव देण्याची, यातून एक संधी मिळत असते.
-
शिक्षा भोगून बाहेर पडल्यावर नव्याने आयुष्याची सुरुवात करताना आपल्या हातात काही तरी कला असावी, हाच या सर्व उपक्रमा मागील उद्देश आहे.
-
नाशिक मध्यवर्ती कारागृहामधील कैद्यांमार्फत गणपती मूर्ती तयार केल्या जात होत्या.
-
तेथील प्रशासनासोबत संवाद साधून आम्ही तेथील दोन मूर्तिकार आपल्या येथे प्रशिक्षण देण्याकरिता मे महिन्यात बोलाविले.
-
या मूर्ती तयार करण्यास जवळपास १५ कैदी सहभागी झाले असून अडीच ते साडेतीन फुट उंचीच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, लाल बागचा राजा अशा विविध मूर्ती तयार केल्या आहेत.
-
या मुर्तींची किंमत ६०० रुपये ते १५ हजार रुपयांपर्यंत आहेत. तर आतापर्यंत जवळपास ५० मुर्तींचे बुकिंग झाले आहे.
-
करोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षातून निर्बंध मुक्त गणेशोत्सव आपण सर्वजण साजरा करीत आहोत.
-
त्यामुळे प्रत्येक गणेश मंडळ आणि घरोघरी आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे.

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश