-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन केलं. यावेळी आम आदमी पक्षाचे आमदार आणि इतर नेते उपस्थित होते. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)
-
दिल्लीतील राजकीय स्थितीसंदर्भात केजरीवाल यांच्या घरी पार पडलेल्या बैठकीनंतर आपच्या आमदारांनी राजघाटाकडे कूच केली. आपच्या या शक्तीप्रदर्शनावेळी ५० आमदार उपस्थित होते. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)
-
दिल्लीतील आम आदमी पक्षाचं सरकार पाडण्याचा भाजपा प्रयत्न करत असल्याचा आरोप आपच्या काही नेत्यांनी केला आहे. पक्ष सोडण्यासाठी भाजपाकडून १२ आमदारांना संपर्क साधण्यात आल्याचा दावा आप खासदार संजय सिंह यांनी केला आहे. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)
-
दिल्लीतील आमदारांना प्रत्येकी 20 कोटींची ऑफर भगव्या गोटातून मिळाल्याचा आरोप आपने केला आहे. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)
-
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावरील छापेमारीदरम्यान घरातील गाद्या आणि भिंतीची सीबीआयनं झडती घेतली. मात्र, या छापेमारीत त्यांना एक रुपयाही भ्रष्टाचाराचा सापडला नाही, असे अरविंद केजरीवाल माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)
-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेचं विशेष अधिवेशन सोमवारी बोलवलं आहे. या अधिवेशनात केजरीवाल सरकार विश्वासदर्शक ठरावाचा सामना करणार आहे. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)
-
भाजपा आपचा एकही आमदार फोडू शकला नाही, हे सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)
-
दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेविरोधात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत. त्यामुळे दिल्लीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)
-
दिल्लीच्या राजघाटावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)
-
मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानाबरोबरच दिल्लीतील ३१ ठिकाणांवर सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)
-
महाराष्ट्रात शिवसेना फोडून एकनाथ शिंदे गट वेगळा करण्यात भाजपाला यश आले. मात्र, मनीष सिसोदियांच्या बाबतीत त्यांना अपयश आले. आता हा प्रयोग ‘आप’च्या आमदारांवर सुरू झाला आहे, असे संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. (फोटो सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?