-
अवघ्या काही सेकंदांमध्ये नोएडातील ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे ट्विन टॉवर्स जमीनदोस्त
-
तब्बल ३ हजार ७०० किलो स्फोटकांचा वापर करून हे ट्विन टॉवर्स पाडण्यात आले आहेत. पाडकामानंतर परिसरात धुळीचं साम्राज्य निर्माण झालं आहे.
-
या पाडकामादरम्यान नोएडा परिसरात ५६० पोलीस, १०० राखीव दलाचे जवान आणि एनडीआरएफच्या (NDRF) चार टीम तैनात करण्यात आल्या होत्या.
-
पाडकामानंतर या परिसरात जवळपास ५५ हजार टन मलबा साचला आहे. ३५ हजार घनमीटर एवढी या मलब्याची व्याप्ती आहे.
-
२१ हजार क्यूबिक मीटर मलबा शहराच्या हद्दीतील एका निश्चित केलेल्या ठिकाणी नेला जाईल, अशी माहिती नोएडा नियोजन प्राधिकरणाने दिली आहे.
-
इमारतीचा उर्वरित मलबा टॉवर्सच्या परिसरातच साठवण्यात येणार आहे. यासाठी इमारतीच्या ठिकाणी मोठा खड्डा खणण्यात आला आहे.
-
टॉवर्सच्या ढिगाऱ्यातून किमान चार हजार टन लोखंड आणि पोलाद बाहेर पडण्याची शक्यता आहे.
-
टॉवर्स पाडण्यात आल्यानंतर शेकडो मीटरपर्यंत धुळीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. यापासून बचावासाठी परिसरात ‘अँटी स्मॉग स्प्रिंक्लर्स’ लावण्यात आले आहेत.
-
या पाडकामादरम्यान टॉवर लगतच्या इमारतींचं कुठलंही नुकसान झालं नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
-
‘एडिफाय इंजिनीअरिंग’ला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले होते. यासाठी कंपनीचे ४६ कर्मचारी कार्यरत होते.
-
‘सुपरटेक’ कंपनीच्या मालकीचे हे टॉवर्स पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं ३१ ऑगस्ट २०२१ रोजी दिले होते. या आदेशानंतर तीनदा टॉवर्स पाडण्याची तारिख विविध कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती.
-
अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवत या प्रकल्पाविरोधात ‘द इमेरॉल्ड कोर्ट ओनर्स रेसिडेन्ट्स वेलफेअर’ने(RWA) न्यायालयात धाव घेतली होती. ९ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर अखेर आज हे टॉवर्स जमीनदोस्त करण्यात आले आहेत.
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा