-
मोदी हे केवळ बहाणा आहेत. जी-२३ सदस्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिल्यापासून काँग्रेस पक्षाला माझ्यासोबत समस्या होत्या, असे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.
-
राजीनाम्यानंतर घर सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप आझाद यांनी केला आहे.
-
राजीनामा देण्याआधी सहा दिवस झोपलो नाही. काँग्रेस पक्षासाठी मी रक्त सांडवलं आहे, असे आझाद दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हणाले.
-
ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज दिल्लीतील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गांधी कुटुंबीय, काँग्रेस पक्षासोबतच विविध विषयांवर भाष्य केलं.
-
काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षात अनेक बैठका होत होत्या. मात्र, या बैठकांमध्ये माझा एकही सल्ला घेण्यात येत नव्हता अशी नाराजी आझाद यांनी व्यक्त केली.
-
काँग्रेसमधील काही लोक अकार्यक्षम आहेत. पक्षाच्या प्रवक्त्यांना आमच्या विषयी काहीही माहित नसणं वेदनादायी असल्याचं आझाद म्हणाले.
-
“मला मोदी खूप कठोर व्यक्ती वाटायचे, पण ते माणुसकी जपणाऱ्यांमधील आहेत” असे गुलाम नबी आझाद म्हणाले आहेत.
-
राहुल गांधींना आम्ही एक यशस्वी नेता बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांनाच रस नव्हता, असा आरोप आझाद यांनी केला आहे.
-
गेल्या ३० वर्षांपासून सोनिया गांधीविषयी असलेला आदर अजुनही कायम आहे. राहुल गांधींच्या दीर्घ आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो, असे आझाद म्हणाले आहेत.
-
जम्मू-काश्मीरातील भाजपाच्या मतदारसंघामध्ये मी एक मतही वाढवू शकत नाही. त्याचप्रकारे माझ्या भागामध्ये तेही प्रभाव दाखवू शकत नाही, असे आझाद यांनी म्हटले आहे.
-
राजीनाम्यानंतर भाजपाच्या वाटेवर असल्याच्या आरोपांना आझाद यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. काँग्रेसमध्ये अशिक्षितांची जमात असल्याची टीका आझाद यांनी केली आहे.
-
काही दिवसांपूर्वी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासोबतच सर्व पदांचा राजीनामा दिला. जम्मू काश्मीरात आझाद नवा पक्ष काढण्याच्या तयारीत आहे. लवकरच त्याबाबतची घोषणा होणार आहे.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल