-
‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ या मुंबईतील पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पाअंतर्गत मंगळवारी प्रथमच भुयारी मार्गावरून मेट्रो धावली.(फोटो – अमित चक्रवर्ती)
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या मेट्रो गाडीला हिरवा झेंडा दाखविला.
-
सारिपूत ते मरोळ अशी तीन किमीचा पल्ला या मेट्रो गाडीने गाठला.
-
मेट्रो ३ प्रकल्पातील पहिल्या मेट्रो गाडीची, भुयारी मार्गिकेची चाचणी यशस्वी झाली आणि मुंबईकर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
-
आता मुंबईकरांना या मेट्रो गाडीतून भुयारी मार्गिकेवरून वेगवान प्रवास करण्याची प्रतीक्षा आहे. पण यासाठी मुंबईकरांना डिसेंबर २०२३ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
-
ही मार्गिका २०२१ मध्ये वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणी, आव्हानात्मक कामे आणि कारशेडचा वाद आदी कारणांमुळे प्रकल्प पूर्णत्वास विलंब झाला आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या मेट्रो ३ च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवताना विरोधकांना जोरदार टोले लगावले.
-
“विघ्नहर्त्याने या राज्यावरील बरीचशी विघ्नं आता दूर केली आहेत. त्यामुळे आता विघ्नं येतील असं मला वाटत नाही,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.
-
तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेट्रो ३ च्या कामाला शुभेच्छा देखील दिल्या.
-
आज आपण पाहतो आहे की तो संपूर्ण महामार्ग पूर्णत्वास जातोय. आपण लवकरच नागपूर ते शिर्डी या महामार्गाचं उद्घाटन करतो आहे. असं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ