-
संपूर्ण भारतीय बनावटीची INS विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कोच्चीमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली.
-
यावेळी “भारतीय सामर्थ्याचं प्रतीक म्हणजे विक्रांत आहे. प्रत्येक भारतीयासाठी आयएनएस विक्रांत म्हणजे स्वाभिमान आहे”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयएनएस विक्रांतच्या सामर्थ्याचा गौरव केला आहे.
-
विक्रांत ही अतिशय बलाढ्या आणि शक्तीशाली अशी विमानवाहू युद्धनौका आहे.
-
एकाच वेळी ३० पेक्षा जास्त विविध प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर वाहून नेण्याची विक्रांतची क्षमता आहे.
-
विक्रांतचे वजन हे तब्बल ४० हजार टन एवढे असून पूर्ण क्षमतेने कार्यरत असताना हे वजन ४५ हजार टन एवढे असते.
-
एका दमात १५ हजार किलोमीटर एवढा पल्ला गाठण्याची विक्रांतची क्षमता आहे.
-
तब्बल १४०० पेक्षा जास्त नौदल सैनिक अधिकारी-कर्मचारी हे विक्रांतवर तैनात राहू शकतात.
-
हवेतील १०० किलोमीटर पर्यंतचे विविध उंचीवरील लक्ष्य भेदणारी बराक-८ ही क्षेपणास्त्रे विक्रांतवर तैनात असणार आहेत.
-
तब्बल २६२ मीटर लांब आणि १४ मजली उंच अशा या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेमुळे नौदलाच्या प्रहार क्षमतेत मोलाची भर पडणार आहे.
-
विमानवाहू युद्धनौका बांधण्याचे तंत्रज्ञान हे अत्यंत आव्हानात्मक समजले जाते.
-
विमनानवाहू युद्धनौक बांधणे हे जगात आत्तापर्यंत फक्त मोजक्या देशांना शक्य झाले आहे. आता यामध्ये भारताचीही भर पडली आहे.
-
स्वदेशी बनावटीची ४४ हजार टन वजनाची आयएनएस विक्रांत ही कोरी करकरीत विमानवाहू नौका कोचीन शिपयार्डने नुकतीच भारतीय नौदलाकडे सुपूर्त केली होती.
-
नौकेत ७६ टक्के स्वदेशी सामग्री आणि उपकरणांचा अंतर्भाव ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे फलित असल्याचे नौदलाने म्हटले आहे.
-
दशकभरात अनेक आव्हानांवर मात करीत ही नौका आकारास आली.
-
आयएनएस विक्रांतने विमानवाहू जहाजांची रचना आणि बांधणीची क्षमता असणाऱ्या जगातील काही मोजक्याच देशांच्या गटात भारताला स्थान मिळवून दिले.
-
भारतीय नौदलाचे प्रभाव क्षेत्र विस्तारण्यासोबत ही नौका शक्ती संतुलनाचे काम करणार आहे.
-
४४ हजार टन वजनाची ही नौका वायू तंत्रज्ञानावर आधारित आहे. संयुक्त गॅस टर्बाईन प्रणालीतून ८० मेगावॉट वीज मिळते.
-
त्यायोगे ती ताशी २८ सागरी मैल वेगात मार्गक्रमण करू शकते.
-
सामान्य स्थितीत १८ सागरी मैल वेगाने ती प्रवास करेल, ज्यामुळे साडेसात ते आठ हजार सागरी मैलाचे अंतर पार करता येईल.
-
२६२ मीटर लांब, ६२ मीटर रुंद आणि ५९ मीटर उंच असे तिचे अवाढव्य रूप आहे.
-
तळभागाचे क्षेत्रफळ दोन फुटबॉल मैदानांइतके भरेल.
-
१४ मजली नौकेच्या पायावर डोलारा सांभाळणारी पाच विशेष स्वरूपाची बांधकामे (सुपर स्ट्रक्चर्स) आहेत.
-
१७०० जणांच्या चालक दलास डोळ्यासमोर ठेऊन २३०० निरनिराळे कप्पे तयार करण्यात आले आहेत.
-
त्यामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. यंत्रणा संचलन, दिशादर्शन, विमानासाठी खास वर्गीकृत केलेल्या जागा आहेत.
-
या विमानवाहू नौकेसाठी खास लढाऊ व्यवस्थापन प्रणालीही देशातच विकसित करण्यात आली.
-
त्याद्वारे जहाजाचे संवेदक, शस्त्रे, माहितीच्या जोडण्या एकत्रित होऊन लढाऊ विभागाची जबाबदारी सांभाळणारे प्रभावीपणे कामगिरी करू शकतील.
-
साधारणत: ३० हलकी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टरचा ताफा तिच्यावर तैनात राहतील.
-
हवाई हल्ल्यांपासून पूर्वसूचना देणारी यंत्रणा, दिशा दर्शनासाठी बहुपर्यायी व्यवस्था अशा अनेक यंत्रणांचा अंतर्भाव आहे.
-
दोन धावपट्ट्यांना कमी जागेत उड्डाण आणि विमान नियंत्रित करण्याच्या व्यवस्थेची जोड मिळाली आहे.
-
आयएनएस विक्रांत आत्मनिर्भर भारताचं प्रतिक ठरणार, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
-
नौदलाच्या नव्या झेंड्यावरून आता सेंट जॉर्ज क्रॉस हटवण्यात आलं आहे.
-
आयएएनएस विक्रांत वर महिला देखील तैनात असणार आहेत, असंही मोदींनी सांगितलं.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”