-
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे.
-
पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला.
-
अपघात इतका भीषण होता की, सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. (Express Photo)
-
दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाला.
-
सायरस मिस्त्री अहमदाबाद येथून मुंबईकडे मर्सिडीज गाडीतून येत असताना चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या अगोदर असलेला खड्डा चुकविताना त्यांची गाडी पुलाच्या कठड्याला जोरदार धडकली.
-
या अपघातामध्ये वाहनामधील एअर बॅग उघडल्या मात्र डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच मृत पावले.
-
अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
-
दरम्यान दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
-
पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. अपघातात दोघे जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ही मर्सिडीज कार होती. गाडीचा क्रमांक MH-47-AB-6705 असा आहे. पुढील प्रक्रिया सध्या सुरु आहे”. (Express Photo)
-
घटनास्थळी पालघरचे पोलीस व इतर शासकीय यंत्रणा पोहोचली असून अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
-
सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर उद्योगासह सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
-
(Photos: Express/ANI)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”