-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (५ सप्टेंबर) सहकुटुंब मुंबईतील ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेतलं.
-
यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेतेही हजर होते.
-
शाहांच्या लालबाग दर्शनावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
-
अमित शाह दरवर्षी गणोशोत्सवात लालबाग राजाच्या दर्शनासाठी येतात.
-
लालगाबचा राजाचं दर्शन घेताना अमित शाहांसोबत त्याची पत्नी, सून आणि नातवंडही असल्याचं पाहायला मिळालं.
-
शाहांनी लालबागचा राजासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतलं.
-
त्यानंतर पुष्पहारही अर्पण केला.
-
यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हेही उपस्थित होते.
-
लालबागचा राजाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शाह आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रा येथील गणपतीच्या दर्शनासाठी गेले.
-
त्यानंतर शाह मलबार हिलला गेले.
-
तेथे देवेंद्र फडणवीसांच्या ‘सागर’ या निवासस्थानी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं.
-
याच ठिकाणी मुंबई कोअर कमिटीची एक बैठकही झाली.
-
फडणवीसांच्या सागर निवासस्थानानंतर ते वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी गेले.
-
या ठिकाणी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४५ मिनिटे बैठक केली.
-
त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते याकडे अनेकांचं लक्ष आहे.

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO