-
भाजपा खासदार गिरिष बापट यांचा आज वाढदिवस आहे. मात्र, वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.
-
‘मी नाराज आहे’, असे स्पष्ट सांगत बापटांनी भाजपासह सर्व पक्षांवर टीका केली आहे.
-
वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेली १२ विधाने पुढीप्रमाणे
-
१. सत्तेची गणितं जुळविण्यासाठी पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक बासनात गुंडाळली जात आहे. सत्ता प्राप्तीसाठी कोणालाही पक्ष प्रवेश दिला जातो.- गिरीष बापट
-
२. भाजपही सत्तेची गणिते जुळवित आहे. पक्षाची बांधिलकी असलेले सच्चे कार्यकर्ते राहिलेले नाहीत- गिरिष बापट
-
३. राजकरण म्हणजे सत्ता किंवा सत्तेची पदे मिळविणे एवढे ध्येय आता कार्यकर्त्यांचे राहिले आहे- – गिरिष बापट
-
४. आता प्रत्येकाला नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार व्हायचे आहे. कार्यकर्त्यांमध्ये तशी चढोओढ लागली- गिरीष बापट
-
५. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो. कार्यकर्ता नसेल तर पक्ष उभा राहणार नाही- गिरीष बापट
-
६. आता कार्यकर्ते पैसे घेऊन जमा करावे लागतात. जेवणावळी घालावी लागतात. राजकारणाचा स्तर खालावला आहे. वैचारिक बांधिलकी कार्यकर्त्यांकडे नाही- गिरिष बापट
-
७. नेत्यांचे, मंत्र्यांचे लांगुनचालन करणे, हार-तुरे देताना छायाचित्रे काढणे, फलक लावणे यात कार्यकर्त्यांना धन्यता वाटत आहे- गिरिष बापट
-
८. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने किमान दहा वर्षे पक्ष संघटनेत काम केल तरच त्याला पक्षात पद देण्यात यावे- गिरिष बापट
-
९. भाजपलाही सत्ता हवी आहे. हा निवडून येऊ शकत नाही. दुसरा निवडून येऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सत्तेची राजकीय गणिते जुळविली जात आहेत- गिरिष बापट
-
१०. आता सत्तेसाठी कोणालाही पक्षात घेतले जाते. कोणालाही जवळ केले जाते- गिरिष बापट
-
११. पक्षांचे निकषही बदललेले आहेत. हा सर्व प्रकार व्यथित करणारा आहे- गिरिष बापट
-
१२. निवडणूक जिंकण्यासाठी दारूड्यालाही जवळ केले जाते. ही प्रवृत्ती माझ्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना सहन होत नाही- गिरिष बापट

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO