-
करोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनंतर राज्यातील गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधांविना मोठ्या धुमधडाक्यात साजरा होताना दिसत आहे.
-
अनेक राजकीय नेतेही सार्वजनिक गणपती मंडळ, कार्यकर्ते आणि मित्र परिवाराच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेत आहेत.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय ‘वर्षा’ या निवासस्थानीही अनेक राजकीय मंडळींनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली.
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.
-
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनीही वर्षा बंगल्यावर जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.
-
त्यानंतर आता ठाकरे घराण्यातील सुपुत्र निहार ठाकरेही बाप्पाच्या दर्शनासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले.
-
त्यांच्यासमवेत पत्नी अंकिता पाटील, निहार ठाकरे यांचे सासरे आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हेदेखील उपस्थित होते.
-
भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठीही नेतेमंडळींनी हजेरी लावली.
-
निहार ठाकरे यांनीही लालबागचा राजाचे दर्शन घेतले.
-
‘लालबागचा राजा’ चरणी निहार ठाकरे पत्नीसह नतमस्तक झाले.
-
स्मिता ठाकरेंनंतर निहार ठाकरे दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी गेल्याने चर्चा रंगू लागल्या आहेत. (सर्व फोटो : निहार ठाकरे, हर्षवर्धन पाटील/ इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख