-
मुसळधार पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना फटका बसला आहे.
-
आज संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतुक कोलमडली आहे.(फोटो- दिपक जोशी)
-
लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार कळवा आणि मुंब्रा दरम्यान जलद मार्गावर पाणी साचलेल्याने त्या मार्गावरील लोकल वाहतुक ठप्प आहे.
-
तर धीम्या मार्गावरही लोकल वाहतुक रखडली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवर काही ठिकाणी पाणी साचले आहे.
-
कार्यालयातून परतण्याची वेळ असल्याने आणि त्यात लोकल सेवा रखडल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहेत.(फोटो- दिपक जोशी)
-
तर वेळापत्रक कोलमडल्याने कल्याणच्या पुढे कर्जत-कसारा लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
-
नेहमीप्रमाणे लोकल ट्रेनमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर उद्घोषणेचा अभाव असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती आहे.
-
हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतुक काहीशा उशीराने पण सुरळीत सुरु आहे.
-
मुंबई आणि आसपासच्या परिसरात बुधवारी सायंकाळी दमदार पाऊस कोसळल्यामुळे घरी जाणाऱ्या नोकरदारवर्गाचे हाल झाले होते.
-
मागील चोवीस तासात सर्वाधिक पाऊस पूर्व उपनगरात पडल्याची नोंद झाली आहे.
-
दरम्यान, आज (गुरुवार) देखील ढगाळ वातावरण राहणार असून गडगडाटासह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
-
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने ऐन गणेशोत्सवात पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे.
-
ठाणे, मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे.
-
नवी मुंबई,, ठाणे परिसरात विजेच्या कडकडासह पाऊस पडतोय.
-
ठाणे शहराला तर पावसाने चांगलेच झोडपले आहे.
-
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर पूर्णपणे जलमय झालेला आहे.
-
ठाणे, कळव्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे.
-
रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने स सीएसएमटी ते ठाणे आणि दिवा, डोंबिवली, कल्याण या सेक्शन मध्ये लोकल ट्रेन्स उशिराने धावत आहेत.
-
गेल्या चोवीस तासात शहर भागात ३०.९६ मिमी, पूर्व उपनगरात ३२.६४ मिमी, पश्चिम उपनगरात १९.२९ मिमी पावसाची नोंद झाली.
-
हवामान खात्याने पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती.
-
तसेच, गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली होती.
-
कडक उन पडल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. सोमवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली.
-
नोकरदार कामावरुन घरी जाण्याची वेळ असल्याने त्यांची चांगलीच धावपळ होत आहे.
-
ठाण्यात अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
-
मुंबईतील काही भागात मंगळवारी सकाळीही पावसाचा मुक्काम होता.
-
रेल्वे ट्रॅक प्रमाणेच शहरातील अनेक रस्त्यांवर देखील मोठ्याप्रमाणावर पाणी साचलेले आहे.

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO