-
बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वाद विकोपाला गेले असले तरी पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे राजकीय वाद विसरून एकत्र आले.
-
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुण्यात सर्वात प्रथम दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेत आरती केली.
-
दुसरीकडे भाजपा नेते चंद्रकांत पाटीलदेखील पुण्यात असून यावेळी त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं.
-
दरम्यान पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार होती तेव्हा आदित्य ठाकरे तिथे पोहोचले.
-
यावेळी चंद्रकांत पाटील तिथेच उपस्थित होते.
-
आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत पालखीजवळ आले असता, चंद्रकांत पाटील यांनी त्यांना आधी दर्शन घेऊन येण्यास सांगितलं.
-
आदित्य ठाकरे दर्शन घेऊन आले तेव्हा पालखी मार्गस्थ होण्याच्या मार्गावर होती. चंद्रकांत पाटील आणि इतर जण आदित्य ठाकरेंची वाट पाहत थांबले होते.
-
आदित्य ठाकरे दर्शन घेऊन आले तेव्हा पालखी मार्गस्थ होण्याच्या मार्गावर होती. चंद्रकांत पाटील आणि इतर जण आदित्य ठाकरेंची वाट पाहत थांबले होते.
-
दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे एकमेकांशी गप्पा मारतानाही दिसले.
-
यानंतर पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची पालखी या दोघांनी एकत्र उचलली.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…