-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी दिल्लीतील ‘कर्तव्यपथ’चे उद्धाटन करण्यात आले. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पांतर्गत इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन या सुमारे ३ किमीच्या ऐतिहासिक ‘राजपथ’चे सुशोभीकरण करण्यात आले आहे. हा मार्ग आता ‘कर्तव्यपथ’ म्हणून ओळखला जाणार आहे.
-
‘कर्तव्यपथ’ परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा २८ फुटांचा पुतळा उभारण्यात आला आहे. काळ्या रंगाच्या ग्रॅनाइटचा हा पुतळा २८० मेट्रिक टन वजनाचा आहे.
-
या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पूरी, जी. किशन रेड्डी, अर्जुन राम मेघवाल, मीनाक्षी लेखी आणि कौशल किशोर उपस्थित होते.(फोटो सौजन्य- ताशी तोबगयाल)
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती.(फोटो सौजन्य- ताशी तोबगयाल)
-
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली होती.(फोटो सौजन्य- ताशी तोबगयाल)
-
उद्घाटन कार्यक्रमादरम्यान ‘कर्तव्यपथ’ आकर्षक रोषणाईने झळाळून निघाला होता. या कार्यक्रमाला दिल्लीकरांनी गर्दी केली होती.(फोटो सौजन्य- ताशी तोबगयाल)
-
कर्तव्यपथाच्या दुतर्फा ३.९० लाख चौरस मीटरचा परिसर हिरवळीने सुशोभित करण्यात आला आहे. या परिसरात १५.५ किमीचे नवे लाल ग्रॅनाईट वॉकवे तयार करण्यात आले आहेत.
-
या संपूर्ण भागात अकराशेहून अधिक वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. इंडिया गेटजवळ ३५ बसेस पार्क करता येणार आहेत.(फोटो सौजन्य- अनिल शर्मा)
-
७४ ऐतिहासिक प्रकाश खांबांसह ९०० हून अधिक नवे प्रकाश खांबही बसवण्यात आले आहेत. सुमारे १ हजारपेक्षा जास्त पांढऱ्या आणि लाल वाळूच्या खडकांमुळे या परिसराला ऐतिहासिक स्वरुप प्राप्त झाले आहे.
-
या संपूर्ण परिसरात ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कृषी भवन आणि वाणिज्य भवनाजवळील कालव्यांमध्ये नौकाविहार करता येणार आहे.
-
कर्तव्यपथावरील आठ प्लाझांमध्ये दिल्ली पर्यंटन विभागांकडून दुकाने उभारण्यात आली आहे. या ठिकाणी पर्यटकांना विविध राज्यांच्या खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे.
-
(फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस, ताशी तोबगयाल)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”