-
भाजपा सतत निवडणुकांसाठी तयार असणारा पक्ष आहे. त्यात आता २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकासाठी भाजपाने १५ राज्यांसाठी प्रभारी, सहप्रभारींची नियुक्ती केली आहे.
-
त्यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांवर महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
-
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे बिहारचे प्रभारीपद देण्यात आलं आहे. यापूर्वी ते हरियाणाचे प्रभारी होते.
-
काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी भाजपाचा हात सोडला होता. त्यामुळे विनोद तावडेंपुढे बिहारसारख्या राज्यामध्ये सत्ता खेचून आणण्यासाठीचे मोठे आव्हान असणार आहे.
-
तर, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची मध्यप्रदेशचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
-
पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेण्याची मागणी समर्थकांनी केली होती.
-
मात्र, पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न दिसत आहे.
-
केंद्रात अनेक मंत्रीपदांवर काम केलेले प्रकाश जावडेकर मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते. केंद्रीय मंत्रिपदावरून हटवल्यापासून ते पक्षात सक्रिय नव्हते.
-
त्यात आता प्रकाश जावडेकर यांच्यावर केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली गेली आहे.
-
प्रकाश जावडेकर यांना केरळमध्ये डाव्यांचा विरोध मोडून भाजपाचा शिरकाव करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.
-
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यावर भाजपाने राजस्थानच्या सहप्रभारी म्हणून नेमणूक केली आहे.
-
ओपरेशन लोटसच्या प्रयत्नानंतर सुद्धा राजस्थानमध्ये काँग्रेसने सत्ता काबीज ठेवली होती. त्याठिकाणी विजया रहाटकर यांना मोठे परिश्रम करावे लागणार आहे.

कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO