-
राज्यातील गणपती विसर्जन मिरवणुका या कायमच चर्चेत असतात.
-
यंदा दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला.
-
त्यातून मुंबईच्या लाल बागच्या राजाचा थाट काही निराळाच असतो.
-
दरवर्षी या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी जगभरातून लाखो भाविक येत असतात.
-
. दरवर्षी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटीपासून, नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात.
-
१० दिवसाच्या उत्सवानंतर गिरगाव चौपाटीवर लालबाग राजाचं विसर्जन करण्यात आलं.
-
लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
-
२३ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबाग राजाला निरोप देण्यात आला.
-
सकाळी ६.३० च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला.
-
यांत्रिक तराफ्याच्या सहाय्यानं लालबागच्या राजाला खोल समुद्रात निरोप दिला गेला.
-
विसर्जनापूर्वी गिरगाव चौपाटीवर लालबाग राजाची आरती करण्यात आली.
-
समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात आली.
-
मुंबईत रात्री उशीरापर्यंत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरु होत्या.
-
लालबाग राजासह गिरगाव चौपाटीवर अनेक गणपतींचं विसर्जन पार पडलं
-
भर पावसातही गणेश भक्तांचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले.
-
पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन घेत आणि आपल्या बाप्पाचं साजिरं रुप डोळ्यात साठवत लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”