-
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मुंबईतील चौपाटीवर भाविकांनी गणरायाचे विसर्जन करण्यासाठी गर्दी केली होती.
-
परंतु, ओहोटीमुळे गणेश मूर्ती समुद्रकिनाऱ्यावर येऊन पडलेल्या आढळल्या.
-
मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी १० सप्टेंबरला मनसेकडून ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ मोहीम राबविण्यात आली.
-
या मोहिमेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेही सहभागी झाले होते.
-
अमित ठाकरेंनी दादर समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून किनारा स्वच्छ केला.
-
या मोहिमेत मनसेच्या कार्यकर्त्यांसह अनेक पर्यावरणप्रेमी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीही सहभागी झाले होते.
-
या मोहिमेअंतर्गत किनाऱ्यावर आलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य गोळा करून ते स्थानिक प्रशासनाकडे सोपविण्यात आले.
-
मुंबईसह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवरही मनसेकडून ही मोहीम राबविण्यात आली. (सर्व फोटो : मनसे/ इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”