-
युरोपातील भीषण उष्णतेमुळे स्वित्झर्लंडमध्ये अनेक हिमनद्या वितळत आहेत. त्यामुळे दोन हिमनद्यामधील दबलेले रस्ते आणि दगड वर आले आहे.
-
स्की रिसॉर्टचा बर्फही पूर्णपणे वितळला आहे. गेल्या २ हजार वर्षात हे पहिल्यांदाच घडले आहे.
-
यंदाच्या भीषण उष्णतेमुळे गेल्या दहा वर्षांच्या सरासरीपेक्षा यंदा तिप्पट बर्फ वितळला आहे. त्यामुळे Scex Rouge आणि Zanfleuron या दोन्ही हिमनद्याखालील रस्ता बाहेर आला आहे.
-
या दोन्ही हिमनद्या २८०० मीटर म्हणजेच ९१८६ फूट उंचीवर आहेत. या महिन्याच्या अखेरीस हा खडकाळ रस्ता पूर्णपणे वर येईल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. कारण हिमनदी वितळणे आणि स्की रिसॉर्टवरील बर्फ वितळणे हे अजूनही सुरू आहे.
-
युनिव्हर्सिटी ऑफ बर्न्स इन्स्टिट्यूट ऑफ जिओग्राफीचे ग्लेशियोलॉजिस्ट माउरो फिशर म्हणतात, दहा वर्षांपूर्वी मी या मार्गावर ५० फूट बर्फाचा थर पाहिला होता. आता तो वितळला आहे.
-
यावर्षी उष्णतेमुळे युरोपची अवस्था बिकट झाली आहे. त्याचा परिणाम स्वित्झर्लंडवरही झाला आहे.
-
ते पुढे म्हणाले, गेल्या हिवाळ्यात हिमवर्षाव कमी झाला होता. त्यानंतर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात ऊन तापली.
-
गेल्या ६० वर्षांत असे कधीच झाले नव्हते. गेल्या सहा दशकांत हिमनद्या सतत वितळत आहेत. अनेक रेकॉर्ड तोडले जात आहेत.
-
गेल्या ८५ वर्षांत स्वित्झर्लंडमधील १४०० हिमनद्या वितळल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच हिमनद्यांचे वितळण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. हवामान बदलामुळे हे घडत आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख