-
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारविरोधात भाजपाने रान पेटवलं आहे.
-
तृणमूल काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार बोकाळला आहे, असा आरोप बाजपाकडून केला जात आहे.
-
याच कारणामुळे ममता बॅनर्जी सरकार आणि भ्रष्टाचाराविरोधात भाजपाने नबन्ना आंदोलनाची हाक दिली.
-
या आंदलोनांतर्गंत राज्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांना कोलकाता शहरात येण्यास सांगण्यात आले होते. मात्र या मोर्चाला पोलिसांनी परावनी नाकारली.
-
कोलकाता शहरासोबतच राज्यात अनेक ठिकाणी भाजपाने मोर्चाचे आयोजन केले होते.
-
राज्यभारातून कोलकात्यात येणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ठिकठिकाणी अडवले.
-
पोलिसांनी आंदोलकांना अडवण्यासाठी बॅरिकेड्स तसेच पाण्याच्या माऱ्याचा वापर केला. मात्र दुसरीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा धारण केला.
-
अनेक ठिकाणी जाळपोळीच्याही घटना घडल्या. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी भाजपाचे अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना ताब्यात घेतले.
-
याच कारणामुळे येथे भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.
-
पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांविरोधात कारवाई केल्यानंतर पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली.
-
ममता बॅनर्जी यांच्यामागील लोकांचा पाठिंबा कमी होत आहे. याच कारणामुळे बॅनर्जी हुकुमशाही लादत आहेत. पोलिसांनी जो जसा व्यवहार केला, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असे सुवेंदू अधिकारी म्हणाले.
-
(सर्व फोटो- ट्विटर)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश