-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. रविवारी सकाळी ‘विदर्भ एक्स्प्रेस’ने ते उपराजधानीत दाखल झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी रेल्वे स्थानकात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
-
राज ठाकरेंचा नागपूर दौरा विदर्भात मनसेच्या पक्षबांधणीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सक्रीय झाले आहेत.
-
नागपुरात पोहोचताच राज ठाकरेंनी रविभवनात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तळागाळात पक्ष मजबूत करा, असा आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला.
-
नागपूर दक्षिण विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत राज ठाकरेंची बैठक पार पडली. पक्षात आलेली मरगळ दूर करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल, असा सल्ला राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला.
-
स्थानिक पातळीवर पक्षबांधणी करा, असा कानमंत्र राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
-
बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदल नक्की घडेल. यातून पक्षाचा नवनिर्माण करू, अशा शब्दात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे.
-
आगामी निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली आहे. आजपासून २२ सप्टेंबरपर्यंत राज ठाकरे पाच दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत.
-
“मी लवकरच विदर्भाचा दौरा पुन्हा करणार आहे. पण तोपर्यंत पक्ष नीट बांधा. पक्षात ऊर्जा आणण्याचे काम आपल्यालाच करायचे आहे”, असे राज ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाले आहेत.
-
नागपुरातील पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर राज ठाकरे सोमवारी चंद्रपूरला रवाना होणार आहेत. या ठिकाणी ते विभागवार बैठका घेणार आहेत.
-
२० आणि २१ सप्टेंबरला राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर असणार आहेत. त्यानंतर २२ सप्टेंबरला ते मुंबईत परतणार आहेत.
-
गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि मनसेमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये युतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “भाजपा दाखवण्यापुरता मित्र आहे. आम्ही त्यांना फारसं महत्व देत नाही”असे विधान मनसे नेते अविनाश जाधव यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान केले आहे.
-
नागपुरातील रविभवनाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली