-
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करत आहेत. तसेच बैठकांच्या माध्मयातून ते पक्षबांधणी करत आहेत.
-
दरम्यान आज त्यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नागपूरमधील मनसेची कार्यकारिणी बरखास्त केल्याची माहिती दिली.
-
नवरात्र झाल्यानंतर कोल्हापूरमार्गे मी कोकणात जाणार आहे. कोकणाचा दौरा करणार आहे. त्यानंतर परत दोन-तीन दिवसांसाठी मी नागपूरला येणार आहे. तेव्हा नागपूरमध्ये परत पक्षबांधणीबाबत निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
-
मनसे आणि भाजपाच्या युतीसंदर्भातील बातम्या मी माध्यमांच्या माध्यमातूनच ऐकतोय. तशी कोणतीही चर्चा नाही. आज पक्षाला १६ वर्षे झाली. मात्र या काळात मला नागपूरमध्ये जसा पक्ष दिसायला हवा होता तसा दिसत नाहीये, असे राज ठाकरे म्हणाले.
-
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूरमध्ये पक्ष बळकट झालेला नाहीये. नागपूरमध्ये अनेक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांना संधी देणे गरजेचे आहे, असे मला वाटते, असेही राज ठाकरे म्हणाले.
-
मागील अडीच वर्षांमध्ये आपण कोणाला मतदान केलं होतं हे कोणालाच माहिती नसेल. महाराष्ट्राच्या राजकारणात एवढा गोंधळ, प्रतारणा मी आजपर्यंत कधीही पाहिलेली नाही.
-
कोण कोणाबरोबर जात आहे. कोण सत्ता स्थापन करतंय. कोण विरोधी पक्षात आहे? अशी परिस्थती मी याआधी कधीही पाहिलेले नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्षावर टीका केली.
-
युती करून, आघाड्या करून निवडणुका लढवल्या जातात. मतदार मतदान करतात. पण निकाल आल्यानंतर कोणीतरीच सकाळी राज्यपालांकडे जाऊन शपथ घेतं. मग भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येतात.
-
पुढे दोन तासांतच काहीतरी बिनसतं. पुढे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येतात. मला ही गोष्टच समजलेली नाही, असे राज ठाकरे यांनी भाजपा आणि राष्ट्रवादीवर टीका केली.
-
फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत बोलताना, औद्योगिक क्षेत्राकडे महाराष्ट्राचे लक्ष नाहीये. नेमकं कोठे बिघडलं याची चौकशी होणे गरजेचे आहे. या उद्योजकांकडे पैसे मागितले गेले का? याची चौकशी करणे गरजेचे आहे, असे मत राज ठाकरे यांनी मांडले.
-
प्रत्येक राज्यात उद्योगधंदे यायलाच पाहिजेत. पण महाराष्ट्रात आलेले उद्योग राज्याबाहेर का जात आहेत, याची चौकशी होणे गरजेचे आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. (फोटो- ट्विटर, मनसे अधिकृत)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख