-
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीबाबतीतील हालचालींना वेग आला आहे.
-
अध्यक्षपदासाठी २४ सप्टेंबरपासून नाम निर्देशन अर्ज दाखल केले जातील. १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक आणि १९ ऑक्टोबरला निकालाची घोषणा होणार आहे.
-
अध्यपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधींनी अद्यापर्यंत होकार दिलेला नाही.
-
त्यात आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांचे नाव या शर्यतीत सर्वात पुढे आहे.
-
अशोक गेहलोत यांनी यासाठी सोनिया गांधी यांची भेट सुद्धा घेतली आहे.
-
गेहलोत यांच्या नावाला राहुल गांधी यांचा देखील पाठिंबा आहे.
-
मात्र, गेहलोत यांच्यासोबत अन्य काही नेते सुद्धा या शर्यतीत आहे.
-
जी-२३ गटातील बंडखोर नेते खासदार शशी थरुर देखील अध्यक्षदासाठी निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत.
-
शशी थरुर यांनी याबाबत सोनिया गांधी यांची भेट सुद्धा घेतली आहे. पण, जी-२३ गटातील काही नेत्यांची शशी थरुर यांच्या नावाला सहमती नसल्याची माहिती समोर आली आहे.
-
तर, काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असे बोलण्यात येत आहे.
-
गेहलोत, थरुर यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याही नावाची चर्चा आहे.
-
दिग्विजय सिंह सध्या राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सामील आहे. लवकरच ते सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
-
दरम्यान, राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून अद्यापही दूर आहेत.
-
2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
-
त्यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं होत की, येथून पुढचा काँग्रेसचा अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरचाचं असेल. ( सर्व फोटो / इंडियन एक्सप्रेस / काँग्रेस ट्विटर अकाउंट )

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल