-
मुंबईच्या शिवाजी पार्कवरील ऐतिहासिक दसरा मेळावा कोण घेणार याबाबत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये चुरस निर्माण झाली होती. या वादावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे.
-
१९६६ पासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे. शिवसेना आणि शिवाजी पार्कचे नाते पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने अधोरेखीत केले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे.
-
“उद्धव ठाकरेंच्या संयमाचा हा विजय आहे. आमच्या परंपरेचा, बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्काराचा आणि मातोश्रीशी निष्ठावंत असलेल्या शिवसैनिकांचा हा विजय आहे”, अशी भावना न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.
-
“उद्धव ठाकरे विनम्रपणे सांगते होते, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार. हा आत्मविश्वास त्यांच्या ठायी क्षणोक्षणी दिसत होता” असे अरविंद सावंत म्हणाले आहेत.
-
“बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद हे आमच्याबरोबर आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून जे आम्हाला चिडवण्याचे प्रयत्न सुरू होते, त्याला हे चोख प्रत्युत्तर होते. सर्वोच्च न्यायालयातली लढाई आणखी बाकी आहे, ती लढाईदेखील आम्ही जिंकू”, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी दिली आहे.
-
दसरा मेळावा शिवतीर्थावरच साजरा करण्यास आम्हाला परवानगी मिळेल, असा आत्मविश्वास होता. आज हा आमचा आत्मविश्वास खरा ठरलेला आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केले आहे.
-
आतातरी शिंदे गटाने शिवसेनेच्या मार्गात काळी मांजरं सोडण्याचा प्रयत्न बंद करावा. लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, तो अधिकार बजावत असताना असे अडथळे आणण्याचं जर त्यांनी काम केलं, तर नक्कीच न्यायालय त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
-
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटातून मंत्री दादा भुसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानुसार आम्ही मेळावा कुठे घ्यायचा हे निश्चित करु, असे भुसे म्हणाले आहेत.
-
एकनाथ शिंदे ज्या जागेची निवड करतील त्या ठिकाणी आनंदात, भव्य दिव्य दसरा मेळावा संप्पन होईल, असे भुसे म्हणाले आहेत.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”