-
उत्तराखंडमधील भाजपा नेते विनोद आर्या यांचे पुत्र पुलकित यांच्यासह दोन साथीदारांना अंकिता भंडारी खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पुलिकत आर्याच्या मालकीच्या ‘वनतारा ‘रिसॉर्टजवळील कालव्यात शनिवारी सकाळी अंकिताचा मृतदेह आढळून आला.
-
१९ वर्षीय अंकिता भंडारी पुलकित आर्याच्या रिसोर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. या प्रकरणाच्या तपासाची दिशाभूल करण्यासाठी मुख्य आरोपी पुलकित आर्याने पीडित तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
-
तरुणीच्या मृत्यूनंतर ह्रषीकेशमधील स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवल्याची घटना समोर आली आहे.
-
शुक्रवारी मध्यरात्री उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या आदेशानंतर या रिसॉर्टचा काही भाग पाडण्यात आला आहे.
-
या प्रकरणात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक पी. रेणुका देवी यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे.
-
वैयक्तिक वादानंतर तरुणीला रिसॉर्टजवळील कालव्यात ढकलून दिल्याची कबूली पोलीस चौकशीत आरोपींनी दिली होती. त्यानुसार शोध घेतल्यानंतर पोलिसांना तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे.
-
हे खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुलकित आर्याचे भाऊ आर्यन यांना उत्तराखंडच्या ओबीसी आयोगाच्या उपाध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहे.
-
तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण केले होते.
-
या प्रकरणात पुलकित आर्यासोबत रिसॉर्टचे व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहव्यवस्थापक अंकित गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा