-
घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला.
-
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भक्तांनी महाराष्ट्रातील देवीच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती.
-
पुण्याच्या चतुःशृंगी देवीच्या मंदिरातही नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला.
-
अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करुन देवीची अद्यावत आरती करण्यात आली.
-
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भक्तांनी देवीचे मंदिर फुलून गेले होते.
-
चतुःशृंगी देवीच मंदिर पुण्यातील सर्वात मोठं आणि जागृत देवस्थान मानलं जातं
-
दरवर्षी लाखो भाविक नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या दर्शनासाठी येतात.
-
करोनानंतर तब्बल २ वर्षानंतर निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत असल्यामुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
-
दागदागिन्यांनी मडलेली देवीची मुर्ती अत्यंत मनमोहक दिसत होती.
-
दिर ट्रस्टकडून नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
-
उत्सवात.श्री देवी चतुःशृंगी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले असणार आहे.
-
भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, पोलिसदल, निमलष्करी दल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-
तसेच संपूर्ण मंदिर परिसरात जागोजागी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
-
मंदिर समितीकडून भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा रुपये दोन कोटींचा विमा करण्यात आला आहे.
-
यावर्षी पासून देवस्थान ट्रस्टची भाविकांनी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्था केलेली आहे. तसेच मंदिर परिसरात देखील ऑफलाईन दर्शन पासेस वितरणासाठी तीन काऊंटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. (फोटो – ओश्वीन कढाओ / इंडियन एक्सप्रेस)

आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना