-
अशोक चव्हाण यांनी बुधवारी नांदेडमध्ये बोलताना महाविकास आघाडीच्याआधी आधी फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीकडे आघाडीचा प्रस्ताव आल्याचा दावा केला होता. यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. अनेकांकडून याबाबत प्रतिक्रिया येत आहेत.
-
भाजपासोबत राहायचे नाही, ही शिवसेनेची भूमिका फडणवीस सरकारच्या काळातच झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी मिळून सरकार स्थापन करावं असा प्रस्ताव घेऊन शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांचं शिष्टमंडळ आलं होतं.
-
त्यात राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे तत्कालीन वरीष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता”, असं अशोक चव्हाण म्हणाले होते.
-
दरम्यान, अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही एक मोठा दावा केला आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे १५ आमदारांच्या गटासह काँग्रेसमध्ये जाणार होते, असा दावा खैरेंनी केला. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच चर्चांना उधाण आलं आहे.
-
चंद्रकांत खैरे म्हणाले, “हे खरं आहे की, फडणवीस सरकारच्या काळातच एकनाथ शिंदेंसह काही नेते अशोक चव्हाण यांच्याकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव घेऊन गेले होते. एवढंच नाही तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदे आम्हाला काँग्रेसमध्ये यायचं आहे असं म्हणत मागे लागले होते. यावेळी काही लोकही उपस्थित होते. यासाठी त्यांनी खूप पाठपुरावा केला, पण ते शक्य झालं नाही.”
-
अशोक चव्हाणांच्या या दाव्यावर आशिष शेलारांनी गंभीर इशारा दिला आहे. “अशोक चव्हाणांची क्लिपच आम्ही जाहीर केली, तर त्यांची अडचण होईल. ते आमचे मित्र आहेत. त्यांची अडचण करण्याची आमची इच्छा नाही.
-
काही राजकीय संदेश, प्रथा, परंपरा असतात. त्या प्रथा परंपरांचा आम्ही भंग करणार नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका-टिप्पणी करणार नाही. त्यांच्या राजकीय कृतीवर आम्ही नक्कीच बोलू शकतो”, असं आशिष शेलार म्हणाले.
-
अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. हा सर्व बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.
-
तेव्हा एकनाथ शिंदे सेना चालवत नव्हते. तेव्हा सेना चालवत होते उद्धव ठाकरे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं नाव घेऊन अशोक चव्हाण संभ्रम निर्माण करत आहेत. उद्धव ठाकरे म्हटलं पाहिजे. उद्धव ठाकरे आमच्याकडे काँग्रेसचं सरकार बसवायला आले होते, असं म्हटलं पाहिजे होतं. उलटं म्हटलं त्यांनी,” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

३ एप्रिल पंचांग: मृगशिरा नक्षत्रामुळे आजचा दिवस जाणार शुभ, पण १२ राशींना ‘या’ गोष्टींपासून राहावे जपून, वाचा तुमचे राशीभविष्य