-
अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याला ‘इयान’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. २४० किमी वेगाने हे वादळ अमेरिकी किनारपट्टीला धडकलं आहे. (फोटो सौजन्य-रॉयटर्स)
-
या वादळामुळे फ्लोरिडातील रस्ते जलमय झाले असून अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. फ्लोरिडामध्ये श्रेणी-४ च्या या विनाशकारी चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.(फोटो सौजन्य-रॉयटर्स)
-
अमरिकेत धडकलेले ‘इयान’ हे वादळ आत्तापर्यंतचे सर्वात शक्तीशाली वादळ असल्याचे बोलले जात आहे. या वादळामुळे फ्लोरिडासह जॉर्जिया आणि दक्षिण कॅरोलिना या दक्षिण-पूर्व राज्यांमधील लोक प्रभावित झाले आहेत. (फोटो सौजन्य-एपी)
-
या वादळात बोट बुडाल्यानंतर २० स्थलांतरित बेपत्ता असल्याची माहिती आहे. तटरक्षक दलाने फ्लोरिडा कीजमध्ये वाहून जाणाऱ्या काही जणांना वाचवले आहे. (फोटो सौजन्य-नासा)
-
या वादळामुळे फ्लोरिडातील जवळपास १८ लाख घरांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती आहे. या वादळामुळे समुद्राने रौद्ररुप धारण केलं आहे. (फोटो सौजन्य-एक्स्प्रेस)
-
या वादळामुळे ७ मीटरपर्यंत उंच लाटा उसळळ्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
-
या वादळामुळे घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली आहेत.(फोटो सौजन्य-रॉयटर्स)
-
अमेरिकन सरकारने फ्लोरिडामध्ये आठवडाभराची आणीबाणी जाहीर केली आहे. जवळपास 25 लाख लोकांना घरे रिकामं करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.(फोटो सौजन्य-एक्स्प्रेस)
-
फ्लोरिडाच्याआधी हे वादळ क्युबाच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकले होते.(फोटो सौजन्य-रॉयटर्स)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई