-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचं एक शिष्टमंडळ काँग्रेसकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव घेऊन आल्याचा गंभीर दावा केला.
-
चव्हाणांच्या या दाव्यावर आता शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी त्या काळात मीही काँग्रेसमध्ये होतो, असं म्हणत त्यांची भूमिका स्पष्ट केली.
-
चव्हाणांच्या दाव्यावर सत्तार म्हणाले, “मी स्वतः त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी अर्जून खोतकर शिवसेनेचे आमदार होते. त्यांनाही विचारून घ्या. आम्ही (काँग्रेसने) शिवसेनेला विनंती गेली होती की, आपण आपली सत्ता स्थापन करू.”
-
“काँग्रेसने शिवसेनेला सत्तास्थापनेची विनंती केली तेव्हा एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते,” असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
-
चंद्रकांत खैरेंच्या आरोपावरही सत्तार यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “ज्यांना गणित कळत नाही, टोटल कळत नाही तेच असे बोलतात.”
-
“तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकूण १०० आमदार होते. एकनाथ शिंदे १५ आमदार घेऊन आले तर सरकार बनलं असतं का? सरकार स्थापन करण्यासाठी १४५ संख्याबळ लागतं. चंद्रकांत खैरेंना साधा अभ्यास करता येत नाही,” असं मत सत्तारांनी व्यक्त केलं.
-
“लोकं किती वेड्यासारखा आरोप करतात. या राजकारण्यांवर मला किव येते,” असं म्हणत सत्तारांनी खैरेंवर निशाणा साधला.
-
ते म्हणाले, “मी फार मोठा पुढारी नाही, एक सामान्य कार्यकर्ता आहे. परंतु १५ आमदार काय, त्यावेळी २५ आमदार आले असते तरी हे सरकार बनलं नसतं. ५० आमदार आले असते तर त्यावेळी सरकारचा विचार झाला असता.”
-
“त्यावेळची परिस्थिती मला चांगली आठवते. आम्ही शिवसेनेला सरकार स्थापन करण्याबाबत विनंती केली होती. मात्र, त्यावेळी एकनाथ शिंदे, अर्जून खोतकर आणि त्यांचे नेते यांनी ते मान्य केलं नाही. मात्र, काँग्रेसकडे तेव्हा एकनाथ शिंदेंचा असा कोणताही प्रस्ताव नव्हता,” असंही त्यांनी नमूद केलं.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”