-
नाटय़मय घडामोडींनतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी अखेर मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे.
-
शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हे स्पष्ट झाले.
-
‘तटस्थ’ सोनिया गांधी यांनी खरगे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवल्यामुळे
-
‘जी-२३’ या बंडखोर गटातील नेत्यांनीही पसंती दिल्यामुळे खरगे हेच नवे पक्षाध्यक्ष होण्याची शक्यता असून निवडणूक ही केवळ औपचारिकता उरली असल्याचे मानले जाते.
-
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माघार घेतल्यानंतर, गुरुवारी रात्री संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि ए. के. अॅण्टनी यांनी सोनिया गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
-
त्यानंतर खरगे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
-
खरगेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याआधी दिग्विजय सिंह यांनी खरगेंची भेट घेतली होती; पण आपण पक्षाध्यक्षपदासाठी उत्सुक नसल्याचे खरगेंनी सांगितले होते.
-
सोनिया गांधी यांनीच खरगेंच्या नावाला पाठिंबा दिल्यामुळे खरगे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास तयार झाले.
-
त्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा दिग्विजय सिंह यांनी खरगेंची भेट घेतली आणि उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय जाहीर केला.
-
खरगे वरिष्ठ नेते असल्याने त्यांच्या विरोधात निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे दिग्विजय सिंह यांनी पत्रकारांना सांगितले.
-
खरगेंच्या ३० अनुमोदकांपैकी दिग्विजय सिंह हेही एक अनुमोदक आहेत.
-
विशेष म्हणजे दिग्विजय सिंह यांनी पक्ष कार्यालयातून रीतसर उमेदवारी अर्जही घेतला होता.
-
यानंतर त्यांनी शशी थरूर यांचीही भेट घेतली होती.
-
झारखंडचे माजी मंत्री के. एन. त्रिपाठी यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे.
-
शशी थरूर यांनी एकूण पाच उमेदवारी अर्ज भरले आहेत.
-
पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील ‘अधिकृत उमेदवारा’बाबत होत असलेली चर्चा मला माहीत आहे.
-
पण कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचे सोनिया गांधी यांनी मला सांगितले आहे.
-
तुम्हाला सध्याचीच परिस्थिती कायम ठेवायची असेल तर तुम्ही खरगेंना मत द्या, पण तुम्हाला पक्षात बदल आणि प्रगती हवी असेल, तर मी त्या बदलासाठीच उभा आहे. असं थरूर म्हणाले आहेत.
-
गेहलोत यांनी राजस्थानमधील ‘बंडा’बद्दल सोनियांशी चर्चा केली.
-
आणि राजस्थानमध्ये झालेल्या राजकीय गोंधळासाठी सोनिया गांधींची माफी मागितली आहे.
-
‘गेल्या दोन दिवसांतील घडामोडींमुळे मी आता पक्षाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही’’, असे गेहलोत यांनी जाहीर केले होते.
-
‘‘राजस्थानमध्ये जे झाले, त्याचा सर्वानाच धक्का बसला असून, मी सोनियांची माफी मागितली आहे. एका वाक्याचा ठराव संमत व्हायला हवा होता’’
-
सोनिया यांनी अशोक गेहलोत यांना पक्षाध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला होता. पण, राजस्थानमधील सुमारे ९० गेहलोत समर्थक आमदारांनी सोनियांच्या दुतांना भेटण्यास नकार दिला होता.
-
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर राजस्थानचे नेतृत्व कोण करणार हे काँग्रेसचे नेतृत्व ठरवेल, असेही अशोक गेहलोत म्हणाले होते.
-
देशातील सध्याची परिस्थिती पाहता एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभे राहण्याची नितांत गरज आहे, असं गेहलोत यांनी म्हटलं होतं.
-
काँग्रेसमधील अन्य नेत्यांनी ही निवडणूक लढवायचे ठरवले असल्यास माझी हरकत नाही, असंही गेहलोत यांनी म्हटलं होतं.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”