-
इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान घडलेल्या हिंसाचारात तब्बल १७४ जणांनी जीव गमावला आहे. या दूर्घटनेत १८० हून जास्त लोक जखमी झाले आहेत. (फोटो सौजन्य-रॉयटर्स)
-
‘अरेमा एफसी’ आणि ‘पर्सेबाया सुराबाय’ या संघांच्या सामन्यादरम्यान ही भीषण घटना घडली आहे. पर्सेबाया सुराबायकडून पराभव झाल्यानंतर अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर गोंधळ घातला. या घटनेत शेकडो लोकांचा मृत्यू झाला.
-
इंडोनेशियातील पूर्व जावा भागात ही घटना घडली आहे. नाराज चाहत्यांना हुसकवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या कांड्यांचा मारा केला. त्यामुळे मैदानावर चेंगराचेंगरी झाली.
-
इंडोनेशियात पुढील वर्षी मे आणि जूनमध्ये फिफाच्या २० वर्षांखालील खेळाडूंच्या विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी घडलेल्या या घटनेनं खेळाडूंच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
-
चेंगराचेंगरीत बेशुद्ध झालेल्या चाहत्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
-
या घटनेनंतर इंडोनेशिया बीआरआई लीगचे सर्व सामने एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत.
-
पराभवामुळे निराश झालेल्या चाहत्यांनी वाहनांची तोडफोड करत जाळपोळ केली.
-
‘फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडोनेशिया’कडून या हिंसाचाराची चौकशी करण्यात येणार आहे.
-
पोलिसांनी सामन्यांदरम्यान बंदुक किंवा अश्रू धुराचा वापर करू नये, असे फिफाच्या सुरक्षा नियमांमध्ये नमुद आहे. मात्र, तरीही चाहत्यांवर अश्रू धुराचा वापर करण्यात आल्याचे पुढे आले आहे.
-
चाहत्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात गोलपोस्टचे नुकसान झाले.
-
मैदानावरील हिंसाचारानंतर स्टेडियममध्ये असे विदारक दृश्य होते.
-
(फोटो सौजन्य-रॉयटर्स)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार