-
मुंबईतील आझाद मैदान ते गेट वे ऑफ इंडियाचा परिसर शनिवारी (१ ऑक्टोबर) “नो एलटीडी-नो व्यसन, युथ अगेंस्ट एलटीडी, नशा म्हणजे नाश, आम्ही विद्यार्थी व्यसनमुक्तीचे सारथी”, अशा व्यसनमुक्तीच्या घोषणांनी दुमदुमत होता. (सर्व छायाचित्र सौजन्य – गणेश शिर्सेकर, एक्स्प्रेस फोटो आणि वर्षा विद्या विलास)
-
किन्नर, माँ की बहने, मुंबईचा डबेवाला, नाका वर्कर, सफाई मित्र, हजारो शालेय व राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व्यसनमुक्तीसाठी रस्त्यावर उतरून निर्व्यसनी महाराष्ट्र सक्षम महाराष्ट्र असा संदेश मुंबईकरांना देत महाराष्ट्र नशामुक्तीसाठी सर्वांना आवाहन करत होते.
-
राष्ट्रपिता महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी’ रॅली १ ऑक्टोबर दुपारी ३ वाजता काढण्यात आली.
-
ही रॅली आझाद मैदान ते गेटवे ऑफ इंडिया जिल्हाधिकारी शहर मुंबई, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण मुंबई विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर – मुंबई उपनगर, मुंबई विद्यापीठ एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, नॅशनल युथ प्रोजेक्ट, प्रजापिता ब्रह्मकुमारीज, अखिल भारतीय नशामुक्ती अभियान (Aina) व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
-
आझाद मैदान येथे सलमा खान, संस्थापिका किन्नर माँ सामाजिक संस्था, अमित घावटे (झोनल डायरेक्टर, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई युनिट) यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. गेट वे ऑफ इंडिया येथे रॅलीची सांगता झाली.
-
यावेळी किन्नर माँ संस्थेच्या सलमा खान यांनी या कामात पाठिंबा देऊन किन्नर समाजाने सर्वसामान्यांसाठी प्रथम व्यसनमुक्ती समुपदेशन केंद्र उभारण्याचा मानस यावेळी व्यक्त केला.
-
संगीतकार गायक गंधार जाधव यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे ‘बंदे मे था दम, वंदे मातरम’ या गीताने रॅलीचे स्वागत केले. यावेळी इतर प्रबोधनपर गीतेही सादर करण्यात आली.
-
या गीतांतून दिलेला व्यसनांपासून दूर राहण्याचं आवाहन तरुणांना करण्यात आलं. या संकल्प सभेची प्रस्तावना नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केली.
-
‘व्यसनांचा पाश करी, आयुष्याचा नाश’ या व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्याचा उद्देश सांगताना त्या म्हणाल्या, व्यसनाच्या विळख्यात आज तरुणाई अडकली आहे.
-
ही गंभीर बाब आहे. तरुणांच्या मेंदू, मन, मनगट यांची सत्कार्साठी गरज आहे. तेव्हा तरुणांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असं मत वर्षा विद्या विलास यांनी व्यक्त केलं.
-
राजीव निवतकर (जिल्हाधिकारी, मुंबई शहर) यांनी दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखवण्यात आला. त्यात त्यांनी म्हटले होते की, राज्य व देश बलशाली करण्यासाठी व्यसनांपासून दूर राहावे.
-
“आयुष्यात आलेल्या चढउतारांमुळे मानसिक खच्चीकरण होऊन व्यसनाच्या आहारी जाऊ नका, संघर्ष करा. निर्व्यसनी राहून व्यसनमुक्त महाराष्ट्र घडविण्यात मोलाचा हातभार लावा,” असे आवाहन त्यांनी उपस्थित तरुणांना केले.
-
सुधीर पुराणिक, सुशील शिंदे, समन्वयक मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व नितीन प्रभू तेंडुलकर एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांनीही या मोहिमेला पाठिंबा देत आम्हीही या व्यसनमुक्तीच्या लढ्यामध्ये सहभागी असल्याचे सांगितले.
-
तसेच निर्व्यसनी युवा पिढी राष्ट्रीय संपत्ती असल्याचे म्हटले आणि ही संपत्ती जतन करण्यासाठी आमचा सदैव सक्रिय सहभाग राहील असे नमूद केले. त्यांच्या या संदेशाचे वाचन उपस्थितांसमोर करण्यात आले.
-
आज तरुणांच्या या मोहिमेला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता आज महाराष्ट्राची वाटचाल जलद गतीने व्यसनमुक्त महाराष्ट्राकडे होत आहे. याबद्दल समाधान वाटतं, अशी भावना महात्मा गांधींचे पणतू तुषार भाई गांधी यांनी व्यक्त केली.
-
“मी माझ्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचे व्यसन स्वतःला लागू देणार नाही. मी आजीवन निर्व्यसनी राहील. मी भारताचा नागरिक भारतातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.”
-
“मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करीन व नवीन कायदे होण्यासाठी मी सक्रिय राहील. मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहिल.”
-
“अमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे. मी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राज्यघटनेचा आदर करीन. जय भारत, जय व्यसनमुक्ती,” असा संकल्प यावेळी उपस्थितांना केला.
-
संविधानातील ४७ कलमाच्या प्रतिकृतीचे सन्मानचिन्ह मान्यवरांना देऊन सन्मानित करण्यात आले.
-
यावेळी अनेक शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, संस्था प्रतिनिधी, सहभागी संस्था ग्लोबल ह्युमन ऑर्गनायझेशन, प्रजापिता ब्रह्मकुमारी, सलाम मुंबई फाउंडेशन, अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, जीवनधारा, कृपा फाउंडेशन, किन्नर माँ, आदर्श फाउंडेशनने सहभाग घेतला.
-
मदरसा गुलशने ए रजा, जमाअत ए इस्लामी हिंद, डॉन बॉस्को डेव्हलपमेंट सोसायटी, नेहरू युवा केंद्र, आयुषमान फाउंडेशन, अविष्कार फाउंडेशन, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समिती, राही सामाजिक संस्थेचाही यात समावेश आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य – गणेश शिर्सेकर, एक्स्प्रेस फोटो आणि वर्षा विद्या विलास)
-
“महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संघमित्र, मुमेंट फॉर पीस अँड जस्टिस, अल्कोहोलिक अॅनँनिमस, महाराष्ट्र घरेलू कामगार युनियन, महिला फेडरेशन, राष्ट्र सेवा दल, मुंबई हॉकर्स युनियन, संकल्प रिहँबिलेशन ट्रस्ट, ब्राईट फ्युचर, स्त्री मुक्ती संघटना, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ, मैत्री संस्था, सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती, नेचर के बंदे, प्रभा भवानी क्रीडा मंडळ, धारावी नशामुक्त अभियान, घर बचाव घर बनाओ, एन. ए. पी. एम., आपला वडापाव, सुनंदा फाउंडेशन, रुग्णमित्र, मंसुरी मानव विकास फाऊंडेशन, मुंबईचा डबेवाला, मर्जी संघटना, सावली संस्था, लक्ष प्राप्ती फेडरेशन, सपोर्ट, भारतीय मुस्लिम महिला आंदोलन, छात्रभारती, दिप अर्चन, रेल युजर सेफ्टी अँड वेल्फेअर असोसिएशन, अमेरिकन केअर इंडिया फाउंडेशन, अत्तारी हेल्पिंग हँड, सेरेबल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया, संकल्प प्रतिष्ठान, मुंबई सिटीजन फोरम, नेव्हर स्लिप हंगरी, भारत बचाव आंदोलन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई शहर यांनी सदर रॅलीत सहभाग घेऊन सक्रियरित्या सहकार्य केले याबद्दल प्रजापिता ब्रह्मकुमारीस गावदेवी सेंटर च्या संचलिका मा. आशा दिदी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…