-
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेट नाकारल्याची चर्चा आहे.
-
ते काही दिवसांपूर्वी आपल्या सूनबाई आणि भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत अमित शाहांची भेट घेण्यासाठी गेले होते, असे म्हटले जात आहे.
-
दरम्यान, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेच चर्चा रंगल्या असून आता भाजपाचे नेते तथा मंत्री गिरिश महाजन यांनी मोठा दावा केला आहे.
-
एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले होते. तेव्हा मिही तेथे होतो. ते म्हणाले की, एकदा आपण बसू. जाऊद्या मिटवून टाका.
-
मात्र त्या भेटीच्या वेळी खूप गर्दी होती. त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय होतं, हे समजू शकले नाही, असे गिरिश महाजन म्हणाले आहेत.
-
गिरिश महाजन यांच्या या माहितीनंतर आता वेवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
-
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी अमित शाहा यांची भेट घेतली होती, असे म्हटले जात होते. यावेळी ते त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत शाह यांच्याकडे गेले होते.
-
या चर्चेनंतर खुद्द खडसे यांनीही स्पष्टीकरण दिले असून शाह यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
-
या भेटीबाबतही गिरिश महाजन यांनी अधिक माहिती दिली होती. अमित शाहांच्या कार्यालयाबाहेर एकनाथ खडसे आणि रक्षाताई खडसे बसल्याची माहिती मला मिळाली, असे गिरिश महाजन यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले होते.
-
मला अमित शाहांच्या कार्यालयाबाहेरून एक फोन आला होता, असे गिरिश महाजन यांनी सांगितले होते.
-
तसेच या फोननंतर मी रक्षाताईंना फोन करून याबाबत विचारलं. तेव्हा रक्षाताई यांनीदेखील मला अधिक माहिती दिली.
-
आम्ही येथे जवळपास तीन तास बसलो. पण आम्हाला वेळ दिला नाही किंवा अमित शाहांनी भेटायला नकार दिला, असे मला रक्षा खडसे यांनी सांगितले, अशी माहिती गिरिश महाजन यांनी माध्यमांना दिली.
-
एकनात खडसे हे अमित शाह यांची भेट घ्यायला गेले होते. मात्र, त्यांच्यात भेट झाली नाही, एवढं मला निश्चित समजले आहे, असे गिरिश महाजन म्हणाले होते.

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ