-
स्वीडिश शास्त्रज्ञ स्वान्ते पाबो यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर झाले आहे. आधुनिक मनुष्याच्या रोगप्रतिकारक प्रणालीचे अत्यंत महत्त्वाचे अंतरंग समजून घेण्याबरोबरच मानवी उत्क्रांतीतील शोधाबाबत पाबे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य-एपी)
-
पाबो यांच्या संशोधनामुळे आधुनिक मानव, ‘निअँडरथल्स’ आणि ‘डेनिसोव्हन्स’ या दोन नष्ट झालेल्या मानवी प्रजातींच्या जनुकांचा तुलनात्मक अभ्यास करता आला, असे नोबेल पारितोषिक समितीने म्हटले आहे.(फोटो सौजन्य-रॉयटर्स)
-
‘निअँडरथल्स’ ही मानवाची एक स्वतंत्र प्रजाती होती. ४० हजार वर्षांपूर्वी नामशेष होईपर्यंत ती हजारो वर्षांपासून युरोपमध्ये अस्तित्वात होती. नामशेष झालेल्या ‘निअँडरथल्स’ या प्रजातीचे आनुवंशिक कोडं उलगडण्याचे अशक्यप्राय कार्य पाबो यांनी केले आहे.(फोटो सौजन्य-एपी)
-
नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याचे कळताच पाबो आश्चर्यचकीत झाले होते. याबाबत सहकाऱ्यांनी खोडसाळपणा केल्याचे पाबो यांना सुरवातीला वाटले होते.(फोटो सौजन्य-रॉयटर्स)
-
६७ वर्षीय पाबो यांनी म्युनिच विद्यापीठ आणि मॅक्स प्लॉन्क संस्थेमध्ये मानवी प्रजातींवर संशोधन केले. पुरस्काराच्या सेलिब्रेशनदरम्यान सहकाऱ्यांनी पाबो यांना स्विमिंग पूलमध्ये ढकलले.(फोटो सौजन्य-एपी)
-
जर्मनीच्या लीपझिग येथील मॅक्स प्लॉन्क संस्थेमधील स्विमिंग पूल मध्ये पोहताना स्वान्ते पाबो…(फोटो सौजन्य-एपी)
-
जनुकांचा प्रवास निअँडरथल्सपासून होमो सेपियन्सपर्यंत झाला होता. तसेच या दोन्ही प्रजातींच्या सहअस्तित्वाच्या काळात त्यांना एकमेकांपासून मुलेही झाली होती, असे पाबो यांच्या संशोधनातून पुढे आले आहे.(फोटो सौजन्य-रॉयटर्स)
-
बेरियातील डेनिसोव्हा गुहेत शास्त्रज्ञांना ४० हजार वर्षांपूर्वीचे बोटाचे हाड सापडले होते. पाबो यांनी बोटांच्या ‘डीएनए’च्या नमुन्याची क्रमवारी लावली आणि तो ‘डीएनए’ अज्ञात ‘होमिनिन’चा असल्याचे शोधून काढले.(फोटो सौजन्य-एपी)
-
स्वान्ते पाबो यांचे वडील सुने बेर्गस्ट्रोम यांनी १९८२ मध्ये वैद्यकशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवला होता.(फोटो सौजन्य-एपी)
Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख