-
बुधवारी (५ सप्टेंबर) शिवतीर्थावर उद्धव ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
-
मागील अनेक दिवस शिंदे गटाशी संघर्ष केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थ मैदान मिळालं आहे.
-
शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा आहे.
-
त्यामुळे दोन्ही गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे.
-
याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हेही आज शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आले होते.
-
यावेळी आदित्य ठाकरेंसोबत खासदार अनिल देसाई, माजी नगरसेविका विशाखा राऊत, विभाग प्रमुख महेश सावंत, राहुल कनाल उपस्थित होते.
-
तयारीची पाहणी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दर्शन घेतलं.
-
यानंतर आदित्य ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील नवरात्रीनिमित्त बसवलेल्या देवीचंही दर्शन घेतलं आहे.
-
शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे.
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा