-
नागपूर : भारत मुक्ती मोर्चातर्फे आज (६ ऑक्टोबर) नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
-
यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
संघाची विचारधारा भारतीय संविधानाला धरून नाही, असे म्हणत या कार्यकर्त्यांनी संघ मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
-
दरम्यान, या मोर्चाला प्रशासनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यातच रोखलं.
-
पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
-
यावेळी इंदोरा चौकात शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते.
-
या आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
-
येथे काही काळासाठी बेझनबाग-इंदोरा परिसरात तणाव निर्माण होता. पोलिसांनी कार्यर्त्यांना तब्यात घेताना सौम्य बळाचा वापर केला.
-
परिणामी कार्यकर्त्यांमध्येही रोष पाहायला मिळाला.
-
संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा ईशारा भारतीय मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिला होता.
-
या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. उच्च न्यायालयानेदेखील मोर्चा काढण्यास मनाई केली होती.
-
उत्तर नागपुरातील बेझनबाग मैदान येथून आज हा मोर्चा निघणार होता.
-
मात्र न्यायालयाने परवानगी नाकारल्याने मोर्चासाठी जमलेल्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी वामन मेश्राम आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
-
दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी इंदोरा व बेझनबाग येथे १४४ कलमांतर्गत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
-
पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून शहरात वाढीव पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
-
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त अश्वती दोर्जे यांच्यासह सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर लक्ष ठेवून आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. (सर्व छायाचित्र : धनंजय खेडकर)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड