-
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज कर्नाकटमध्ये पक्षाच्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पदयात्राही केली.
-
दरम्यान, यावेळी सोनिया गांधी यांच्या बुटाची लेस सुटल्याचे लक्षात येतात, राहुल गांधी यांनी खाली बसून लेस बांधून दिली. आई-मुलाच्या या प्रेमाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
-
कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यात काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ पोहोचताच सोनिया गांधी यांनीही या पदयात्रेत सहभाग घेतला.
-
प्रकृतीच्या कारणास्तव बऱ्याच दिवसांपासून सोनिया गांधी या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होत्या. ‘भारत जोडो यात्रा’ सुरू झाली, तेव्हा त्यांच्यावर विदेशात उपचार सुरू होते. तसेच काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आईंचेही निधन झाले होते.
-
दरम्यान, ४ सप्टेंबर रोजीच सोनिया गांधी कर्नाटकमध्ये पोहोचल्या होत्या. दसऱ्याच्या दिवशी त्यांनी बेगुर गावातील भीमनाकोली मंदिरात पुजा केली.
-
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून सुरू झाली. ही पदयात्रा एकूण ३,५७० किलोमीटर आहे.
-
महागाई, बेरोजगारी तसेच जीएसटीमुळे देशात निर्माण झालेली आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकारणाच्या केंद्रीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तीव्र झालेल्या प्रश्नांकडे केंद्रातील सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘भारत जोडो’ पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचे काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले आहे.
-
केंद्र सरकारविरोधात देशातील जनतेने संघटित होणे हे या पदयात्रेचे उद्दिष्ट आहे. वाढती बेरोजगारी, वाढत्या किमती आणि वाढती असमानता या समस्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहेच,
-
पण केंद्र सरकारमुळे निर्माण झालेले भय, धर्माधता आणि पूर्वग्रहदूषित राजकारणाविरोधात देश आणि सर्वसामान्य नागरिकांना एकत्र येण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”