-
मृतांमध्ये लहान मुलासह आईचाही समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
-
अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतल्याचे सांगितले जाते. अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती आहे. यवतमाळहून ही बस मुंबईला निघाली होती.
-
पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळश्याने भरलेल्या डंपरने धडक दिली.
-
अपघातानंतर बसने पेट घेतला. गाठ झोपेत असणारे प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला. बसमध्ये ३० प्रवासी होते.
-
काहींनी उड्या मारल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
-
अर्धा ते पाऊण तास पेटलेली बस विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. मयत प्रवाशांचे मृतदेह मनपाच्या सिटीलिंक बसमधून हलविण्यात आले.
-
आगीत बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला.
-
बसमधील ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले.
-
या दुर्घटनेत १७ प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान डोईफोडे यांनी दिली.
-
नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळहून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता ही बस निघाली होती.
-
सकाळी सव्वा पाच वाजता ती या चौकात अपघातग्रस्त झाली. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. त्यापैकी ११ व्यक्तींचा जागीच मृत्यू झाल्याचं नाईकनवरे यांनी सांगितलं. आसपासच्या नागरिकांनी धाव घेत दोन-तीन जणांना वाचवले. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, असंही आयुक्त म्हणाले.
-
प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. बस, डंपर व टेम्पो यांच्यात हा विचित्र अपघात झाला. डंपरचालक फरार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
