-
तामिळनाडून सुरुवात झालेली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ कर्नाटकात पोहचली आहे.
-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
-
तामिळनाडू, केरळ आणि आता कर्नाटकात पोहचलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ला एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे.
-
त्यात शुक्रवारी कर्नाटकात हत्या झालेल्या पत्रकार गौरी लंकेश यांची आई आणि बहीण काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाल्या.
-
गौरी लंकेश यांची आई इंदिरा लंकेश आणि बहीण कविता लंकेश यांनी कर्नाटकमधील मांडय़ा जिल्ह्यात राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर काही अंतरापर्यंत त्या यात्रेत चालल्या.
-
राहुल गांधी यांनी इंदिरा लंकेश यांना अलिंगन देऊन त्यांचे यात्रेत स्वागत केले. पदयात्रेदरम्यान ते इंदिरा यांचा हात पकडून चालत होते. गौरी लंकेश या कर्नाटकमधील होत्या.
-
दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही गुरुवारी ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाल्या होत्या.
-
कर्नाटकमधील बेल्लाळेपासून सुरु झालेल्या यात्रेत सोनिया गांधी सामील झाल्या. सोनिया गांधींनी एक किलोमीटर पायी प्रवास केला. त्यानंतर राहुल गांधींनी त्यांना उर्वरित प्रवास कारमधून करण्यात विनंती केली.
-
काही वेळ गेल्यावर जक्कनहल्ली ते चौदेनहल्ली या एक किलोमीटर प्रवासात सोनिया गांधींनी पुन्हा सहभाग नोंदवला. त्यानंतर सोनिया गांधी दिल्लीला रवाना झाल्या. ( सर्व फोटो – काँग्रेस ट्विटर / पीटीआय )
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल