-
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत, ‘जिंकून दाखवणारच’ अशी दोनच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (सर्व फोटो-संग्रहित)
-
“बहुतेक उद्धव ठाकरे हे विसरलेत की नोटबंदीनंतरच्या सगळ्या निवडणुका ते मोदींच्या नाण्यावरच जिंकले आहेत. त्यांचे १८ खासदार आणि ५६ आमदार मोदीजींचं नाणं दाखवूनच निवडून आले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच श्रद्धेय राहतील, पण देशात मोदींचं नाणं चालतच राहील” – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
-
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचे अंतरिम आदेश दिले, यात आपल्याला काहीही आश्चर्य वाटलं नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
-
“बोलायला आपण काहीही बोलू शकतो. एका चॅनलवर कुणीतरी म्हटलं की शिवसेनेनं सांगितलेल्या नव्या नावांच्या मागे शरद पवार आहेत. ज्याला जे वाटतं ते तो सांगतो” – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
-
“खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!”
-
“चिन्ह असो अथवा नसो, निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.
-
“आता इथून पुढे निवडणुकांना जर सामोरं जायचं असेल आणि शक्तीशाली एखादी संघटना असेल, तर ती जे चिन्ह ठरवेल ते शेवटपर्यंत टिकेलच असं सांगता येणार नाही.
-
“शिवसेना अजिबात संपणार नाही, उलट अधिक जोमाने वाढेल. त्यांची जी तरूण पिढी आहे ती जिद्दीने उतरेल आणि ते आपली शक्ती वाढवतील.”
-
“सरकारच्या स्वायंत्त संस्था ईडी, सीबीआयनंतर निवडणूक आयोगही बेठबिगार झाला आहे. कोणी तरी तक्रार केली, याची छानणी न करता निवडणूक आयोगाने चार तासात आदेश दिला आहे. कोणाच्या आदेशानुसार हे सर्व सुरु आहे. देश हुकूमशाहीकडे चालला आहे.”
-
“हा निर्णय अनाकलनीय आहे. चिन्हाबाबत आयोगानं आधी बोलण्याची संधी द्यायला हवी.”, असे शिवसेना खासदार अनिल देसाईंनी म्हटले आहे.
-
“आज ज्या प्रकारचे राजकारण सुरू होते. त्यावरून हा निर्णय अपेक्षित होते. आयोगाने हा निर्णय तात्पुरता घेतला आहे. मात्र, अंतिम निकाल आमच्या बाजुनेच लागेल.”
-
“निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे. त्याप्रमाणे आम्ही निडणूक आयोगाला तीन नावं आणि तीन चिन्ह देऊ आणि त्यापैकी जे चिन्ह मिळेल त्या जोरावर आम्ही निडणुकाही जिंकून दाखवू.” – अनिल परब शिवसेना, नेते
-
“निवडणूक आयोग स्वायत्त असलं, तरी केंद्र सरकारच्या हाताखाली काम करतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या यंत्रणा आपल्या हातात ठेवल्या आहेत. मंत्र्यांच्या हातातही काहीही नाही. देवेंद्र फडणवीस त्यांचे खास आहे. देवेंद्र फडणवीसांनी हा सगळा डाव रचला आहे.”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
-
“चिन्हाचा निर्णय एकवेळ ठिक आहे. मात्र, निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव वापरायचं नाही, असा जो निर्णय दिला आहे. ते ऐकून मला वाईट वाटलं.”
-
“मी अनेक निवडणुका शिवसेना या नावावर लढवल्या आहेत. हे नाव आज राज्यातील खेडोपाड्यात, अनेकांच्या मनात पोहोचलं आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी हे नाव दिले होते. ते नाव जर संपवण्यात येत असेल तर त्याचे मला दुख होते आहे” असंही भुजबळ म्हणाले.
-
“बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाच्या विचारापासून लांब गेलात म्हणून आपले चिन्ह गेले, पक्ष तुमच्यापासून लांब गेला याची जाणीव आदित्य ठाकरेंनी ठेवावी.” – दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री
-
“सत्ताकाळात आलेल्या लोकांना न भेटणे, वाईट शब्दांमध्ये बोलणे, लोकांची कामे न करणे, या सगळ्या वागण्याचे लोकांनी तुम्हाला प्रायश्चित्त दिलं.” – दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री
-
“आमचे चिन्ह गोठले असेल, रक्त नाही.” असं एक ट्वीट करत दानवेंनी सोबत उद्धव ठाकरे यांचा जाहीर सभेतील दोन्ही हात उंचावतानाचा फोटो शेअर केला आहे. – अंबादास दानवे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते
-
“आता कदाचित न पक्षाचे नाव असेल न चिन्ह! सोबत आहे फक्त ‘ठाकरे’ नावाचा पुण्यसंचय आणि सत्कर्म.. कायदेशीर लढाया सुरूच राहतील.. मात्र आमच्या पूर्वाश्रमीच्या मित्राने कितीही आपटली तरी ‘ठाकरे’ नावाचे वलय काढून घेण्यास त्यांना अजून अनेक जन्म घ्यावे लागतील.” असंही दानवे म्हणाले आहेत.
-
अमेय खोपकर यांनी ट्वीट करत “चिन्हं बदलतात, कुणाची गोठतात. मात्र, आमचं रेल्वे इंजिन मात्र सुसाट धावते आहे”, असा खोचक टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
-
“मुख्यमंत्रीपदापायी मती गेली, मतीविना हिंदुत्वनीती गेली, नीतीविना जनता गेली. जनतेसोबत सैनिक गेले, सैनिकानंतर चिन्ह व पक्षही गेला, इतके अनर्थ मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने केले.”, असे ट्वीट उपाध्ये यांनी केले आहे.
-
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना, धनुष्यबाण वाढीसाठी आयुष्यभर जी मेहनत घेतली होती. ती दोघांच्या भांडण्यात निवडणूक आयोगाने गोठविली. हे खूप क्लेशदायक आहे.” – एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस
-
“शिवसेना आमची असल्याची वल्गना करणाऱ्यांनी बाजारात आपल्या आईला विकलं” – किशोरी पेडणेकर, शिवसेना नेत्या.
-
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय क्रौर्य किती भयाण आहे, याची प्रचिती आली. – किशोरी पेडणेकर, शिवसेना नेत्या.
-
“शिवसेना पक्ष नव्हे तर कुटुंब आहे, हे दसरा मेळाव्याच्या दिवशी सर्वांनी पाहिलं. त्यानंतरच लवकर निर्णय घेण्याची गडबड करण्यात आली. अंधेरी पोटनिवडणुकीत लढणार नव्हते. मात्र तरीही शिंदे गटाने कारण नसताना पक्षचिन्हावर दावा केला” – किशोरी पेडणेकर, शिवसेना नेत्या.
-
“शिवसेनेला या उंबरठ्यावर आणले, त्या एकनाथ शिंदेंविषयी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात चीड आहे. आगामी निवडणुकांमध्ये जनतेची चीड दिसून येईल.” – किशोरी पेडणेकर, शिवसेना नेत्या.
-
सध्या राज्यात समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आम्हाला उद्धव ठाकरे यांचे मत जाणून घ्यावे लागेल, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
-
“बंडखोरांपुढे लोटांगण घालून शेवटपर्यंत सत्ता टिकविण्याचा लाचार हव्यास नडला. त्यांची जर लगेच पक्षातून हकालपट्टी केली असती तर किमान पक्षावर नाव व चिन्ह गमावण्याची नामुष्की ओढावली नसती. असो, तरी पण आम्ही तुम्हाला संपलेला पक्ष बोलणार नाही.” – प्रमोद पाटील, आमदार, मनसे
-
“यापूर्वी पक्षाचं चिन्ह गोठवल्याचं आम्ही ऐकलं होते. मात्र, निवडणूक आयोगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झालं की ‘शिवसेना’ नावही गोठवण्यात आलं आहे. चिन्ह आणि नाव गोठवलं असल तरी, पक्षाचा इतिहास कसे पुसू शकता.” -प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना खासदार
-
“बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाला ‘शिवसेना’ नावं दिलं. महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी बाळासाहेब लढले, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम पन्नास खोके गटाने केलं.” – प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना खासदार
-
शिंदे गट ही भाजपाची बी टीम झाली असून, त्यांचा फक्त वापर करण्यात येईल. शिंदे गट म्हणजे ‘चार दिन की चॉंदनी’ आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे प्रत्येक शिवसैनिकाचे रक्त सळसळत आहे.” – प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना खासदार
-
“खरे शिवसैनिक आणि बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार एकनाथ शिंदेंबरोबर आहेत. शिवसेना चिन्ह आणि पक्षाचं नाव आपल्याला मिळेल हा उद्धव ठाकरेंचा दावा आयोगाने फेटाळला आहे.” – रवी राणा, आमदार
-
“महाविकास आघाडीबरोबर जात बाळासाहेबांनी बनवलेल्या पक्षाची माती करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं.” – रवी राणा, आमदार
-
“शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल लोकांसाठी धक्कादायक असला तरी अनपेक्षित मात्र नक्कीच नाही.” असं रोहित पवार म्हणाले आहेत.
-
“चिन्ह गोठवलं म्हणजे आपले मनसुबे साध्य होतील, असा त्रयस्थांचा अंदाज असला तरी लोकांच्या मनातली निष्ठा मात्र गोठवता येणार नाही.”, असे रोहित पवार यांनी केले आहे.
-
“दसरा मेळाव्यात दिसलेली निष्ठा निवडणुकांमध्येही निश्चित दिसेल. धनुष्यबाणाचं चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठल्याने खऱ्या शिवसैनिकाला अत्यंत वेदना होत असणार, हे मात्र खरं आहे.
-
पण ज्यांना त्रास होत नसेल त्यांनी दुसऱ्यांची स्क्रिप्ट स्वीकारली असंच म्हणावं लागेल”, असेही रोहित पवार म्हणाले.
-
“संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचं नावही संपलं आणि चिन्हही. कालाय तस्मै नम:” – संदीप देशपांडे, मनसे नेते.
-
“या सगळ्या प्रकरणात दोन मुद्दे आहेत. एक तर शिवसेनेवर हा अन्याय आहेच. पण मला एक जुनं गाणं आठवतं. ‘हम बेवफा, हरगिज न थे.. पर हम वफा कर ना सके. भाजपानं एकनाथ शिंदेंवर असाच वार केला आहे. चिन्ह आणि नाव कुणालाच मिळालं नाही” – सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
-
“जेव्हा खुज्या लोकांच्या सावल्या लांब पडायला लागतात, तेव्हा समजून घ्याव की अंधार जास्त पडतो आहे. हे सर्व भाजपाचे कारस्थान आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू आणि जिंकू” – सुषमा अंधारे, शिवसेना उपनेत्या
-
“हिंदुत्व” से जो टकरायेगा. वो मिट्टी मे मिल जायेगा. जय श्री राम.! – नितेश राणे, आमदार, भाजपा
-
“शिंदेंचा खांदा वापरून भाजपाने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा फडशा पाडण्याचे काम चालवले आहे. आता धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले आहे. भाजपाचे काम फत्ते झाले आहे. आता हस्तक शिंदेंचा भाजपाला काय उपयोग? एकनाथ शिंदे यांच्याराजकीय अस्ताची ही सुरूवात आहे?” – रविकांत वरपे, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस
-
“उद्धव ठाकरे यांच्या भोळेपणाचा फायदा शरद पवार आणि अजित पवार यांनी घेतला आहे. शरद पवार यांचा डाव अखेर यशस्वी झाला आहे.”
-
“शरद पवार आणि उद्धव ठाकरे या कटकारस्थानाला जबाबदार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय दुर्दैवी आहे.”
-
“निर्णय हे गुणवत्तेवरून घेतल्या जातील याची खात्री हल्ली देता येत नाही. त्यामुळे असं काहीतरी घडेल हे गेले काही दिवस वाचत होतो, ते घडलं. पण असं घडेल असं माझं मन मला सांगत होतं.”
-
“वडिलांनी जे कमावले होते ते मुलांनी एका मिनिटांमध्ये घालविले.” – एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस
-
“उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही. तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे. त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे, ज्याला इंग्रजीमध्ये Victim Card असं म्हणतात. जे यापुढे सातत्याने बघायला मिळेल.” – संदीप देशपांडे, मनसे नेते.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”